Pandharpur Live News Online : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होतय . मुंबईत मतदानानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज झाले असुन
5 अप्पर पोलीस आयुक्तांसह 25 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील ज्या मतदारसंघात निवडणूक होणारय, त्यामध्ये मुंबईतील 6 तसंच ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे. पियूष गोयल, भारती पवार, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे आदी दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा आहे. या टप्प्यानंतर सर्वांनाच उत्सुकता असेल ती 4 जूनच्या निकालाची.
मुंबईतील चुरशीच्या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि वायव्य मुंबई या सहा तसेच राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे अशा १३ लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाकडून २ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित ४ जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी दोन हात करणार आहेत. महायुतीमध्ये ३ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने शड्डू ठोकला होता.
मुंबईतील मतदारसंघ आणि उमेदवार
१. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव
२. दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई
३. उत्तर मुंबई – पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील
४. उत्तर मध्य मुंबई – उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड
५. उत्तर पूर्व मुंबई – मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील
६. वायव्य मुंबई – रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर
कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती.
७. कल्याण : शिंदे गट श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गट वैशाली दरेकर
८. भिवंडी : भाजप कपिल पाटील विरुद्ध पवार गट सुरेश म्हात्रे
९. धुळे : भाजपा सुभाष भामरे विरुद्ध कॉंग्रेस शोभा बच्छाव विरुद्ध वंचित अब्दुल रेहमान
१०. दिंडोरी : भाजपाच्या भारती पवार विरुद्ध पवार गटाचे भास्कर भगरे
११. नाशिक : शिंदे गट हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गट राजाभाऊ वाजे विरुद्ध अपक्ष शांतिगिरी महाराज
१२. पालघर : भाजप हेमंत विष्णू सावरा विरुद्ध ठाकरे गट भारती कामडी विरुद्ध बविआ राजेश पाटील
१३. ठाणे : शिवसेना शिंदे गट नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे