गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
पंढरपूर Live 28 August 2017
डेरा सच्चाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना बलात्कार आणि लैंगिक शोषणाप्रकरणी सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राम रहिमला शिक्षा सुनावली जात असताना त्यांला रडू कोसळले. यावेळी रोहतकच्या विशेष कोर्टात फक्त ६ जण होते. सीबीआयच्या वकिलांनी बाबा राम रहिम यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली जावी अशीच मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.
बाबा राम रहिम ला शिक्षा सुनावताना त्यांनी केलेल्या समाजसेवेचा विचार केला जावा अशी मागणी राम रहिम यांच्या वकिलाने कोर्टात केली होती. दोन्ही पक्षांना युक्तिवाद मांडण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता.
बाबा राम रहिम ला रोहतकच्या तुरुंगात ठेवण्यात आले असून त्याच ठिकाणी असलेल्या विशेष न्यायलायात ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर आता बाबा राम रहिम यांचे वकील हायकोर्टात जामिनाचा अर्ज करू शकतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा हिंसाचार उसळू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांच्यावर त्यांच्याच आश्रमातील दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. बाबा रहिम यांनी १५ वर्षांपूर्वी त्यांच्या आश्रमातील दोन साध्वींवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. या दोन्ही प्रकरणात बाबा राम रहिम यांना दोषी ठरविण्यात आले आहे. शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना दोषी ठरवताच पंचकुलामध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. बाबा राम रहिम हे आम्हाला पित्यासमान आहेत ते असा कोणताही प्रकार करूच शकत नाहीत असा दावा डेरा सच्चाच्या हजारो अनुयायांनी केला आहे.

२००१ मध्ये या सगळ्या प्रकरणाची बातमी ‘पुरा सच’ या स्थानिक दैनिकात छापून आली होती. हे सगळं प्रकरण पत्रकार रामचंद्र यांनीच छापले होते. मात्र पत्रकार रामचंद्र यांचीही हत्या करण्यात आली होती. पत्रकार रामचंद्र यांच्या हत्येचा आरोपही बाबा राम रहिम यांच्यावर आहे. तसेच २०१२ मध्ये डेरा सच्चा सौदाच्या ४०० पुरूष अनुयायांची नसबंदी केल्याचाही आरोप बाबा राम रहिम यांच्यावर आहे. या सगळ्या आरोपांपैकी दोन साध्वींवर झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणा प्रकरणी बाबा राम रहिम यांना सीबीआय कोर्टाने दोषी ठरविले आहे.
कोण आहेत बाबा राम रहिम?
१९६७ मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहिम यांना तेव्हाचे डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी २३ सप्टेंबर १९९० मध्ये आपला वारसदार जाहीर केले, त्यानंतर वयाच्या २३ व्या वर्षी बाबा राम रहिम हे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख झाले. बाबा राम रहिम यांच्याकडे डेरा सच्चा सौदाची जबाबदारी आल्यानंतर डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता प्रचंड वाढली. बाबा राम रहिम यांना सिनेमात काम करण्याचाही छंद आहे.

राम रहिम यांनी स्वतःला लोकांपुढे देव म्हणून सादर केले आणि त्यांची लोकप्रियता शिख समाजात मोठ्या प्रमाणावर वाढली. कारण प्रमुख झाल्यापासूनच सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि सर्वधर्मसमभाव जपण्याचा संदेश दिला. ज्यानंतर त्यांच्या अनुयायांची संख्या वाढत गेली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111