👁 10 Views

समाजातील वंचीत शोषीतांना सन्मान देण्याचे काम केले कोळ्याचा राजा मंडळाने..!

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 2 september  2017 

सर्वसामान्य माणसाच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा व त्यांची दु:खं जाणुन घेण्याचा केला प्रयत्न!
पंढरपूर (प्रतिनिधी):- ‘‘ जे का रंजले गांजले… त्यासी म्हणे जो आपुले.. तोची साधु ओळखावा.. देव तेथेची जाणावा। या संतवचनानुसार ‘कोळ्याचा राजा’ आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे गणेशोत्सव मंडळाने आपल्या मंडळाच्या माध्यमातून विविध  जाती-धर्मातील वंचीत, शोषीत घटकांना आपल्या ‘श्री’ च्या आरतीचा सन्मान देऊन त्यांना आपल्या प्रश्‍नावर बोलतं करण्याचं काम केले आहे. नुकताच मंडळाने पारधी जमातबांधव, अग्निशमक दल कर्मचारी, मुर्तीकार आदी बांधवांना आपल्या मंडळाच्या ‘श्री’ च्या आरतीचा सन्मान देऊन त्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे सत्कर्म केले.
हल्ली गणेशोत्सव म्हटलं की, डामडौल अन् आतिषबाजी असे समीकरण होऊन बसलेले आहे. परंतु गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयुष्यभर सन्मानापासून वंचीत राहिलेले व मोडून पडलेल्या कण्याने संसाराचा गाडा हाकलणार्‍या विविध समाजबांधवांचा कणा ताठ करण्याचे काम आमच्या मंडळाने केले आहे. नुसती ‘श्री’ ची आरतीच त्यांच्या हस्ते केली असे नाही तर त्यांच्या दैनंदीन जगण्यातील अडी-अडचणी व त्यांचे प्रश्‍नही जाणुन घेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. ‘कोळ्याचा राजा’ आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे मंडळाचे संस्थापक गणेश अंकुशराव यांच्या कल्पकतेतून व मार्गदर्शनाखाली या मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गणेशोत्सव काळात विविध समाजोपयोगी वैविध्यपुर्ण असे उपक्रम राबवत असतात. आत्तापर्यंत आमच्या मंडळाने वासुदेव, घडशी, हातगाडीवाले, पारधी, अग्निशमक दल यांना ‘श्री’ च्या आरती व पुजेचा सन्मान दिला आहे. अशी माहिती या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  
नुकतीच पारधी जमात बांधवांच्या हस्ते आरती झाली तेंव्हा या जमातीतील सौ.सुमनबाई सुरेश पवार, सुरेश बंडु पवार, जयतु भोसले विक्रम समन पवार, मुर्तीकार राजेंद्र हरी परदेशी, दत्ता औदुंबर परदेशी, विकी विजय परदेशी, अमीत जयसिंग मंडवाले, अग्निशमक दलाचे पांडु मवारे, रवि नगरे, गोकुळ शिंदे, विष्णु गुमटे  आदींसह संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, निलेश माने, हणमंत कोरे, विकी अभंगराव, महावीर अभंगराव, अभिराज परचंडे, अवधुत परचंडे, संजय खंडागळे, शुभम ननवरे, विशाल कोताळकर, शिवप्रसाद संगीतराव, बशीर शेख, प्रसाद कांबळे, प्रसाद कोळी, तुकाराम संगीतराव, संकेत परचंडे, प्रशांत संगीतराव, संजय ननवरे, अक्षय म्हेत्रे, संतोष माने, शंकर आमले, कुंडलीक परचंडे व मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *