👁 5 Views

पंढरपूर: घरी परताच मुलीची’ ती, अवस्था पाहून आई, वडिलांनी फोडला हंबरडा, घटनेनं पंढरपुरात खळबळ

 

सोलापूर :  पंढरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात अभ्यास करणाऱ्या मुलीने अचानक घराच्या लोखंडी अँगला गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्यानं शहरात खळबळ उडाली आहे.


रुपाली नामदेव बंकवाड असं या मुलीचं नाव आहे. रुपालीने अचानक टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप केणतंही कारण समोर आलेलं नाहीये. रुपालीच्या असं अचानक जाण्यानं तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.


घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हलाकीची परिस्थिती घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रुपाली बंकवाड या मुलीच्या घरची परिस्थिती हलाकीची होती. आई, वडील मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदर्निवाह करत होते. नेहमीप्रमाणे आई, वडील कामासाठी बाहेर गेले होते.


तर रुपाली घरी अभ्यास करत बसली होती. मात्र जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांना धक्काच बसला. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी अँगला त्यांना रुपाली गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसून आली. तीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केलं.

गळफासाचं कारण अस्पष्ट रुपाली बंकवाड ही मुलगी अत्यतं गरीब कुटुंबातील होती. आई,वडील बाहेर कामासाठी गेले असता तिने घरातच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. रुपालीने आत्महत्या का केली याबात अद्याप कोणतही कारण समोर आलेलं नाहीये. घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसां दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *