👁 8 Views

गुगल बऱ्याच गोष्टींचा शोध घेतो पण, ज्ञानाचा शोध घ्यायला शिक्षकच हवा ! -एम.के.सी.एल.चे एम.डी. विवेक सावंत

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 6 september  2017 
श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये शिक्षक दिन’ उत्साहात साजरा !
पंढरपूरः ‘विचार देतो तो पंडित, विद्या देतो तो आचार्य, दुरदृष्टी देतो तो द्रष्टा आणि ज्ञान देतो तो गुरु म्हणुन आपल्या ज्ञानात जो कोणी माणूस भर टाकेल तो गुरूच्या स्वरुपात असतो. यामुळे समाज हा शिक्षकांना गुरुस्थानी सन्मानाने दर्जा दिला आहे म्हणुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या केवळ ज्ञानात भर पडेल एवढेच न पाहता त्याच्यावर उपयुक्त संस्कार रुजले पाहिजे असे शिक्षण द्यावे. गुगल वापरून आपण बऱ्याच गोष्टींचा शोध घेतो पण, ज्ञानाचा शोध शिक्षकच लावतो. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर कसे पडेल हे पहिले पाहिजे.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक सावंत यांनी शिक्षक दिनी केले.
               गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती असलेल्या अॅम्पिथिएटरमध्ये भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एम.के.सी.एल.चे एम.डी. विवेक सावंत हे विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करत होते. सावंत यांनी ‘थेअरी इज ग्रीन, लाईफ इज एव्हरग्रीन’ असा मौलीक संदेश विद्यार्थ्यांना दिला.   भारतरत्न डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी संस्था उभारणीची संघर्षपुर्ण वाटचाल कथित करुन शिक्षकदिनाचे महत्व पटवून दिले. सांगोला महाविद्यालयाचे बाबुराव गायकवाड म्हणाले,‘पूर्वी इतके शिक्षकांचे महत्व सध्याच्या शिक्षकांनी राखले पाहिजे. शिक्षक हे नोकरी नसून व्रत आहे. त्यासाठी हे हाती घेतलेले व्रत सचोटीने पुर्ण केले पाहिजे. स्वेरीच्या यशस्वी वाटचालीचा मी एक साक्षीदार आहे. स्वेरीला आश्रय दात्यांची जाणीव आहे. हे खूप महत्वाचे आहे स्वेरीला देणगी दिल्याचे सार्थक झाले. पूजा नकाते व अभिनव आनंद यांनी शिक्षक दिनाचे महत्व पटविणारी भाषणे दिली. विवेक वर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जे.एस.सपाटे म्हणाले, ‘शिक्षक व्यासंगी असला पाहिजे. शिक्षकांनी कार्य मनापासून केले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे समाधान होवून  परिपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांला मिळेल.’ पुढे बोलताना एम.डी. सावंत म्हणाले की, ‘पोहून पोहूनच पोहायला शिकता येते त्याप्रमाणेच तंत्रशिक्षण घेवूनच अभियंता बनता येते यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण आत्मसात करणे गरजेच आहे. शिक्षकांनी आपली ओळख ही विद्यार्थ्यांच्या भूतकाळात न पाहता त्याचा भविष्यकाळ कसा घडेल  हे पाहणाऱ्यालाच आदर्श शिक्षक म्हणतात आणि इथे आदर्श पिढी घडविण्याचे सुंदर कार्य घडत आहे त्यामुळे मला येथील हे विद्यार्थी २१ व्या शतकाचे प्रतिक वाटतात.’ असे सांगून सर्व दिन साजरे होतात परंतु रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या बळीराजासाठी देखील ‘शेतकरी दिन’ साजरा व्हायला हवा.’ अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंढरपुरातील साहित्यिक व कवी उमेश सासवडकर यांच्या‘वाटेत भेटलेली माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते झाले. संपूर्ण दिवसभर महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी हे शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत होते. यावेळी स्वेरीला देणगी दिलेल्या आश्रयदात्यांचा सत्कार करण्यात आला. बी. फार्मसीचे प्रा. गुरव, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे डिप्लोमाचे प्राचार्य प्रा. एन.डी. मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वेरीचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, विश्वस्त बी.डी.रोंगे, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटीलप्रा.यशपाल खेडकरअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी, पालक व स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयाचे सुमारे ४ हजार विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन दत्तराज चिल्लाळ, स्वप्ना सावंत, प्रतीक्षा साळुंखे यांनी केले तर स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
छायाचित्रः-शिक्षक दिनानिमित्त भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, सोबत डावीकडून संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, प्राचार्य प्रा. जे.एस.सपाटे, विश्वस्त बी.डी.रोंगे,  डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, डिप्लोमाचे प्राचार्य प्रा. एन.डी. मिसाळ  व इतर. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *