- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 7 september 2017
पंढरपूर दि.7:- विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी तसेच नागरीकांना शासकीय कामकाजासाठी लागणारे जातीचे, नॉनक्रिमिलेयरचे तसेच विविध प्रकारचे दाखले मुदती मिळावेत यासाठी विशेष यंत्राणा राबवून उपविभागातील पंढरपूर व मोहोळ या दोन तालुक्यातून एकूण 8 हजार 602 दाखले उपविभागीय कार्यालयाकडून वितरीत करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी दिली.
पंढरपूर उपविभागीय कार्यालयातून माहे एप्रिल ते ऑगस्ट 2017 या कालावधीत पंढरपूर तालुक्यात 4 हजार 800 दाखले व मोहोळ तालुक्यात 3802 दाखले असे एकूण 8 हजार 602 दाखले वितरीत करण्यात आले आहेत. विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी सेतू केंद्रातून तसेच इतर महा-ई सेवा केंद्रातून प्राप्त होण्या-या दाखल्यांचा वारंवार आढावा घेवून दाखले मुदतीत देण्यावर भर देण्यात येत असल्याचेही प्रांतधिकारी डॉ.देशमुख यांनी सांगितले.
पंढरपूर उपविभागात माहे सप्टेंबर ते नोंव्हेबर -2017 या कालावधीत महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून, या अभियानातंर्गत महसुली कामकाज, सर्व प्रकारचे शैक्षणिक प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून मंडल स्तरावर शिबीर आयोजीत करुन शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत नागरीकांना शासकीय विभागाच्या सेवा सुविधा बाबतची माहिती देण्यात येणार असल्याचेही प्रांतधिकारी विजय देशमुख यांनी सांगितले.
तसेच पंढरपूर उपविभागातील विद्यार्थी व नागरीकांना महसूल विभागाकडील कामाकाजाबाबत काही अडचणी आल्यास त्यांनी लेखी अर्ज उपविभागीय कार्यालयाकडे द्यावा असे आवाहन नायब तहसिलदार अविनाश पवार यांनी केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


