👁 9 Views

शिक्षकच विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाचा शिल्पकार असतो- सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 7 september  2017 
पंढरपूर: दि.०६ “समाजात माता-पित्या बरोबर शिक्षकाला स्थान आहे.
मोबाईलमुळे आपण वाचनापासून दूर गेलो आहोत. वाचन संस्कृती जपणे आवश्यक
आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
विद्यार्थ्यामध्ये प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम करण्याचे ज्ञान देणे आवश्यक आहे.
प्रामाणिकपणा विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाची गुरु किल्ली आहे. आपले संशोधन
समाज उपयोगी असावे. आयुष्य जगण्याचे काम सुविचार करतो, तो सुविचार
शिक्षकच देतो. शिक्षकच विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाचा शिल्पकार असतो.” असे
प्रतिपादन सोलापूर विभाग उच्च शिक्षण, विभागीय सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे
यांनी केले.

पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयातील सांकृतिक विभागाच्या वतीने आयोजित शिक्षकदिन समारंभ
प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त
करताना प्राचार्य जाधव म्हणाले. ‘समाजातल्या शेवटच्या माणसासाठी काम
करण्याचे विचार कर्मवीर अण्णांनी दिले.रयत मधील सेवक मनापासून प्रामाणिक
काम करतो. नितीमान समाज घडविण्याचे काम शिक्षक करतो.’ यावेळी
व्यासपीठावर कलाविभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, विज्ञानविभागाचे
उपप्राचार्य प्रा. जे. एस. पाटील, सांगोला महाविद्यालय, सांगोलाचे डॉ एस. एल.
पाटील सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. विकास कदम, डॉ. एच. एम. लोंढे,
रजिस्टार श्री. बी. व्ही. होवाळ, आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक
व पाहुण्याचा परिचय डॉ. विकास कदम यांनी करून दिला. मान्यवरच्या हस्ते
शिक्षक-शिक्षेकेतर सेवक यांचा श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा. आर. एस. पवार, डॉ. ए. बी. कांबळे यांनी केले. आभार डॉ. एच.

एम. लोंढे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील निवृत्त सेवक, शिक्षक-
शिक्षेकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
— — — — — — — — — — — — — — — — — — —

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *