- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर ः दि.8 – पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावात नीरा उजव्या कालव्यातून पाणी सोडून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा,कालव्याची दारे दुरूस्ती, पाण्याचे काटेकोर नियोजन व कालव्याच्या साईटपट्टीचे मुरूमीकरण करणे या मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेने व लाभ क्षेत्रातील शेतकर्यांनी तलाव परिसरातील स्मशान भूमीमध्ये बुधवार दि.06.09.2017 पासून उपोषण सुरू केले होते. कोणतेही आश्वासन न मिळाल्याने अद्याप पर्यंत सदरचे उपोषण चालू होते.
सदर उपोषणाला पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारतनाना भालके यांनी आज शुक्रवार दि.08.09.2017 रोजी सकाळी समक्ष भेट देऊन उपोषण कर्त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. आमदार श्री भारतनाना भालके यांनी त्वरीत एन.आर.बी.सी.चे अधिक्षक अभियंता श्री चोपडे, कार्यकारी अभियंताश्री श्री सिध्दमल यांना ङ्गोन वरून सदर मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच उपोषणाच्या ठिकाणी ठिकाणी उपस्थित असणारे एन.आर.बी.सी.चे प्र.उप अभियंता श्री ठवरे यांना समक्ष सूचना देऊन त्वरीत योग्य ती कार्यवाही करणेस सांगितले. तिसंगी तलावामध्ये पाणी सोडण्याबाबत निर्णय झालेला असून तिसंगी तलावामध्ये आज पाणी सोडण्यात येईल. तसेच जे.सी.बी.व पोकलॅण्डच्या सहाय्याने कालव्याच्या साईटपट्टीचे मुरूमीकरण करून देणेबाबतच्या मागण्या आमदार भारतनाना भालके यांचे मध्यस्थीमुळे पुर्ण होणार असल्यामुळे सदरचे उपोषण कर्त्यांनी उपोषण समाप्त केले.
सदर उपोषणातील मागण्या पूर्ण झाल्यामुळे तिसंगी तलाच्या लाभक्षेत्रामधील येणार्या 9 गांवातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सदर उपोषणास तिसंगी तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी व स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



