- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मुंबई, दि. 12 : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी उडीद आणि मुगाची खरेदी शासन हमीभावाने करणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
राज्यात या वर्षी उडीद व मुगाचे चांगले उत्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळणे गरजेचे आहे. उडीद व मूग खरेदी केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, शेतकऱ्यांनी कमी दारात उडीद आणि मूग बाजारात विक्री करण्याची घाई करू नये,खरेदी केंद्रे सुरु होईपर्यंत वाट पहावी. शासन त्यांना हमीभाव मिळवून देईल, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांना तातडीने पैशांची गरज आहे अशा शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दरात शेतमाल विक्री न करता शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत शासन शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देईल.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन नये म्हणून राज्यभर लवकरच खरेदी केंद्रे उभारली जातील. या केंद्रांवर हमी भावाने शेतकऱ्यांचे उडीद व मूग खरेदी केले जातील. एखादा व्यापारी कमी दरात शेतकऱ्यांचा माल खरेदी करत असेल, तर ती बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. शासन अशा व्यापाऱ्यांवर ठोस कारवाई करेल.आपला माल कमी दरात न विकता योग्य दरात विकावा, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


