👁 11 Views

मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करावा- मुख्य निवडणूक अधिकारी

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12  september  2017 
मुंबईदि. 12 : मतदार यादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ERO-Net ही नवीन संगणक प्रणाली विकसित केली असून यापुढे या प्रणालीच्या आधारेच मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदार नोंदणीच्या अनुषंगाने आपले अर्ज प्राधान्याने ऑनलाईनरित्या करावेतअसे आवाहन राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम दरवर्षी करण्यात येत असते. ही मतदार यादी संगणकीय प्रणालीच्या आधारे तयार करण्यात येत असते. सध्या ही यादीERMS (Electorol Roll Management System) या संगणक प्रणालीच्या आधारे तयार केली जात आहे. तथापि आता भारत निवडणूक आयोगानेERO-Net या नावाची नवीन संगणक प्रणाली विकसित केली असून यापुढे ERO-Net  या प्रणालीच्या आधारेच मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. तसेच आता ERO-Net  ही प्रणाली देशभर समान पद्धतीने हाताळण्यात येणार आहे.
            भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यात ERO-Net ही संगणक प्रणाली सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. NVSP वर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेले सर्व नवीन अर्ज ERO-Net प्रणालीवर हाताळण्यात यावेअशा सूचना सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. तरी नागरिकांनी यापुढे आपले अर्ज करण्यासाठी www.nvsp.in या संकेतस्थळाचा प्राधान्याने वापर करावाअसेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *