👁 8 Views

आईस्क्रीम उद्योगाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – सुभाष देसाई

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 16  september  2017 


मुंबई :
 राज्यातील आईस्क्रीम उद्योगाला चालना मिळावी तसेच आईस्क्रीम उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून या उद्योगाच्या वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. इंडियन आईस्क्रीम संघटनेच्या वतीने गोरेगाव येथील मैदानात आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
            श्री. देसाई पुढे म्हणालेपोषणमुल्य असलेल्या आईस्क्रीमचा उपभोग (consumption) घेणा-यांची  संख्या जगाच्या तुलनेत कमी आहे. जगात प्रती व्यक्ती सुमारे १२ लिटर एवढे आईस्क्रीम खाल्ले जाते,आपल्याकडे मात्र हा खप प्रतीव्यक्ती केवळ अर्धा लिटर एवढा कमी आहे. आईस्क्रीम व्यवसायाला १८ टक्के दराने जी एसटी लागू झाला आहे, तर दुग्धजन्य मिठाई  व्यवसायाला ५ टक्के जी एस टी लागू आहे. आईस्क्रीम व्यवसायाला मिठाई व्यवसायाचा दर्जा मिळून त्यावर मिठाई व्यवसायाप्रमाणे जी एस टी लागू व्हावीतसेच आईस्क्रीम साठवणुकीसाठी आवश्यक असलेले कोल्ड स्टोरेज राज्यात अधिक प्रमाणात उपलब्ध व्हावी या मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
            गोरेगांव येथील नेस्को मैदानावर सुरू असलेल्या या प्रदर्शनात आईस्क्रीम उद्योगाशी संबधीत उपकरणेनवीन तंत्रज्ञानवेगवेगळ्या प्रदेशातील आईस्क्रीम उत्पादने इत्यादी एकत्रित ठेवण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ आणि १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *