- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 16 september 2017
पंढरपूर (प्रतिनिधी) – छायाचित्र कला ही केवळ पोटभरण्याचे साधन राहिलेली नाही. या कलेच्या माध्यमातून समाजाच्या अंतर्मनाचा अभ्यास करून आनंददायी जीवनाची अनुभूती मिळता येते त्यामुळेच समाजातील एक मोठा वर्ग या छायाचित्र कलेकडे आकर्षित होत असल्याचे प्रतिपादन छायाचित्राचे अभ्यासक डी एल पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर छायाचित्राचे अभ्यासक सुनील जाधव, किरण तांबट, जेष्ठ छायाचित्रकार तुकाराम डिंगरे, स्पर्धेचे आयोजक श्रीकांत लव्हेकर उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील जेष्ठ छायाचित्रकार श्रीकांत लव्हेकर यांच्या व्यंकटेश व्हिडीओ व्हिजन संस्थेच्यावतीने ‘मोरया फोटो उत्सव ‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील ९२ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. ९२ स्पर्धकांच्या १८४ फोटोचे प्रदर्शन टिळक स्मारक मैदान येथे भरविण्यात आले होते. 

या आगळ्यावेगळ्या फोटो प्रदर्शनाला पंढरपूरच्या कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, लातूर, उमरगा आदी जिल्ह्यातील व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने स्पर्धेचे क्रमांक काढताना पारदर्शकता असावी यासाठी डी एल पवार (नाशिक), सुनील जाधव (पुणे), किरण तांबट (नाशिक) या छायाचित्र तज्ञांची निवड करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या निरिक्षणानुसार ९२ स्पर्धकांपैकी पहिल्या फेरीत १३ जणांची निवड केली. दुसऱ्या फेरीत ५ जणांची निवड करून ५ मध्ये ३ छायाचित्र बेस्ट थ्री म्हणून निवडण्यात आली.
त्यामध्ये पांडुरंग वागडे, सुनिल उंबरे आणि धनंजय कडलाक या तीन छायाचित्रकारांचे छायाचित्र निवडण्यात आली. मिळालेल्या गुणांनुसार वागडे यांना प्रथम क्रमांक, सुनील उंबरे यांना द्वितीय अन धनराज कडलाख यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.
तर दै.पंढरी संचारचे विजय कुलकर्णी आणि राहूल गोडसे, यांच्या छायाचित्रांना उत्कृष्ट छायाचित्र म्हणून गौरविण्यात आले. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तर दिपक भंडारी ठरला प्रेक्षकांण मधून विजेता फोटीग्राफर म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला
पंढरपूर मधील छायाचित्रकारांकडे अभ्यासू नजर आहे या कलाकारांना प्रोत्साहीत करण्यासाठी छायाचित्र कार्यशाळा आणि फोटो स्पर्धांचे आयोजन करा अशी सूचना फुजी फिल्म्सचे व्यवस्थापक सुनिल जाधव यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक इरकल यांनी केले प्रास्ताविक राजेश अंबिके यांनी तर आभार बशीर शेख यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ चित्रकार भारत गदगे, राजेश अंबिके, विलास जोशी, श्रीराम बडवे, बापू कदम, विनायक देवकर, योगेश कटकमवार, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
बॉक्स …
जेष्ठ छायाचित्रकाराचा मानपत्र देऊन सन्मान
पंढरपूर मधील जेष्ठ छायाचित्रकार तुकाराम डिंगरे यांनी छायाचित्र व्यवसायात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

