👁 7 Views

उद्या पंढरीत लेझीम, लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार, भालाफेक आदी शिवकालीन मर्दानी खेळांचा अविष्कार…पंढरपूरकरांना कोल्हापूरच्या ताराराणीच्या लेकींचा ‘झंझावात’ पाहण्याची सुवर्णसंधी!

Pandharpur Live : 
पंढरपूर (प्रतिनिधी):- उद्या दि. 21 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता पंढरीत शिवकालीन मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवम् ट्रेडर्स या फर्मने आयोजत केलेल्या या कार्यक्रमाद्वारे मर्दानी खेळांचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूरच्या ताराराणींच्या लेकींचा ‘झंझावात’ हा कार्यक्रम संपुर्णत: मोफत पाहण्याची सुवर्णसंधी पंढरपूरकरांना लाभणार आहे.

उद्या सायंकाळी 7 वाजता येथील शिवम, ट्रेडर्स, शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. यावेळी लेझीम, लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार, भाला, विटा, फरीगदगा, लिंबू काढणी, मावळ्यांच्या पोटावर व गळ्यावर ठेवलेला पानाचा विडा किंवा काकडीचे तलवारीने अचूकपणे दोन तुकडे करणे, काठीने मावळ्यांच्या दंडावर, डोक्यावर ठेवलेले नारळ फोडणे आदी कलागुणांचे सादरीकरण होणार आहे.

काळाची गरज ओळखून महिला व मुलींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होण्यासाठी व तो वाढण्यासाठी त्यांच्यात साहस निर्माण करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देणार्‍या कोल्हापूर येथील लेकींचा हा ‘झंझावाती’ अविष्कार पाहण्यासाठी तमाम पंढरपूरकरांनी व पंढरपूर तालुक्यातील महिला भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवम ट्रेडर्स चे संचालक विजयकुमार गायकवाड यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव येथील  मुलींना  स्वरक्षणाचे  धडे  देऊन  त्यांचे मन, मनगट आणि मेंदू कणखर  बनविण्याचे कार्य कोल्हापूरचे वस्ताद प्रमोद पाटील यांनी सुरू केले आहे, जेण ेकरून इथल्या मुली स्वतःचे  आत्मसंरक्षण करू शकतील याची अनुभूती  पंढरपूर मधील माता-भगिनीपर्यंत पोहचावी  व  प्रेरीत होऊन त्यांनीही अशा प्रकारच्या कला आत्मसात करुन स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हावे या अनुषंगाने शिवम ट्रेडर्स च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
आपल्याला  छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे.  हा इतिहास पाहत असताना आपल्या लक्षात येईल की पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन दोन्ही हातांमध्ये तलवार दांडपट्टा अशी शस्त्रे  घेऊन शत्रूशी दोन हात करण्यामध्ये या स्वराज्यातील  माता बहिणी तरबेज होत्या. म्हणूनच म्हणतात ना … 
‘‘पुरुष काय स्त्रिया ही लढल्या… परंपरा ही आमुची…पहा चाळुनी पाने  आमच्या ईतिहासाची!’’

तर मग महिला भगिणींनो न चुकता उद्या दि. 21 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता शिवम ट्रेडर्स, शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड पंढरपूर येथे कोल्हापूरच्या रणरागिणींचा वरील शिवकालीन ‘झंझावाती’ अविष्कार पाहण्यासाठी अवश्य उपस्थित रहा. 

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *