👁 9 Views

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदी अजित पवारच… महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्तही अखेर ठरला !

Pandharpur Live : 
महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार यावरून बरीच चर्चा झाली.परंतु  आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेचमहाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील हे राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार हे आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत. एसीबीकडून अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली त्याचा आनंदच आहे, असं राऊत म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पर पडला. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

मात्र अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ न घेतल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र अखेर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


येत्या २४ तारखेला ठाकरे सरकारमध्ये नव्या मंत्र्यांना सामील करून घेतले जाईल

 ठाकरे सरकारच्या बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तारासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. त्यानुसार येत्या २४ तारखेला ठाकरे सरकारमध्ये नव्या मंत्र्यांना सामील करू घेतले जाईल. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी तिन्ही पक्षांच्या मिळून एकूण २९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. यामध्ये शिवसेनेचे १० (७ कॅबिनेट+ ३ राज्यमंत्री), राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ (८ कॅबिनेट+ ३ राज्यमंत्री) आणि काँग्रेसचे आठ आमदारांचा (६ कॅबिनेट+ २ राज्यमंत्री) समावेश आहे. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. 
यावेळी काँग्रेसमधून कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळेल, यावर शिक्कामोर्तब होईल.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *