👁 11 Views

खळबळजनक… पंढरपूर तालुक्यात दुधात भेसळीचे प्रकार; तालुक्यातील एका डेअरीवर धाड… दुधात मिसळत होते कॉटनसीड तेल आणि बरेच काही!

Pandharpur Live :
पंढरपूर तालुक्यात दुधात भेसळीच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. पंढरपूर तालुक्यातील एका दुध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने धाड टाकल्यानंतर गंभीर प्रकार आढळून आला. दुधाची फॅट वाढण्यासाठी येथे चक्क दुधामध्ये  व्हे परमिट पावडर, लॅक्टोज पावडर व रिफाईंड कॉटनसीड तेल टाकून सदर द्रावण मिक्सरवर फिरवून कृत्रिम भेसळयुक्त दुध तयार केले जात होते. या धाडीत 500 लिटर भेसळयुक्त दुध ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली.

तपकिरी शेटफळ (ता़ पंढरपूर) येथील शहाजी गोपाळ साबळे यांचे शाम दूध संकलन केंद्र आहे़ या केंद्रात अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या अनुषंगे अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने तपासणी केली. 

या संकलन केंद्रावर संकलीत होणाऱ्या ५०० लिटर दुधात भेसळयुक्त दूध मिक्स करून दुधाची गुणवत्ता कृत्रिमरित्या वाढवून जास्त नफेखोरी करण्याचा व्यवसाय सदर संकलन केंद्रावर चालू असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर पेढीस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर पेढीस भेसळकारी पदार्थाच्या पुरावठादारांवर तसेच भेसळीचे दूध स्वीकार करणाऱ्या पेद्यामधील जबाबदार व्यक्तीवर अधिकृत माहिती प्राप्त होताच प्रथम खबरी अहवाल दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, मंगेश लवटे यांनी सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, कोणत्याही प्रकारची भेसळ अन्न पदार्थात खपवून घेतली जाणार नाही अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.

(बातमीत प्रतिकात्मक छायाचित्र आहे.)

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *