Pandharpur Live :
”जे लोक लोकांना चुकीच्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करतात, ते नेते नव्हेत. सध्या मोठय़ा संख्येत विद्यापीठातील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेच घडत आहे. काही लोक जमावाला आपल्या शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. हे काही नेतृत्व नव्हे,” असे एका आरोग्यविषयक परिषदेत बोलताना लष्करप्रमुख म्हणाले.
कॉलेज आणि विद्यापीठातले विद्यार्थी आंदोलनात भाग घेत असल्यामुळेच हिंसाचाराच्या घटना वाढल्याचं वक्तव्य विद्यार्थ्यामुळेच भारताचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केलं.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु असलेल्या निदर्शनांवर ते बोलत होते. जनरल बिपिन रावत म्हणाले, “नेता तोच असतो जो लोकांना योग्य मार्गाने घेऊन जातो.”
“ज्या संख्येने कॉलेज आणि विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत त्यामुळे शहरात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना वाढत आहेत. नेतृत्वाने माथी भडकवण्याचं काम करु नये,” असं ते म्हणाले.
जनरल बिपिन रावत हे 31 डिसेंबर रोजी निवृत्त होतील. दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी CAA आणि NRC विरोधात जी आंदोलनं सुरु आहेत त्यावर आपलं मत व्यक्त केलं.
रावत म्हणाले, “नेत्याची ओळख ही त्याच्या नेतृत्वावरुनच करता येते. जर तुम्ही प्रगतीच्या वाटेवर आहात तर तुमच्या मागे सर्वजण येतील. नेता तोच असतो जो लोकांना योग्य दिशेला घेऊन जातो. सध्या जे आपण पाहतोय, की कॉलेज आणि विद्यापीठातले विद्यार्थी रस्त्यावर उतरुन विरोध प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे हिंसाचाराच्या आणि जाळपोळीच्या घटना वाढत आहेत. हे काही नेतृत्व नाही.”
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रावत यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. ते म्हणतात की “काही नेते आपल्या अनुयायांना चिथावणी देत आहेत. आंबेडकर असो वा गांधी या सर्वांना हाच संदेश दिला आहे की लोकशाहीच्या मार्गाने शांततापूर्णरीत्या निदर्शनं करावीत. लोकांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान करु नये.”
पुढे ते सांगतात, “नेत्याने आपल्या पार्टीला योग्य मार्गाने घेऊन जाणंच ठीक आहे. मी पण लोकांना हेच सांगू इच्छितो की जर तुम्हाला विरोध करायचाच असेल तर तो शांततापूर्ण मार्गाने करा.”
आपल्या भाषणात बिपिन रावत पुढे म्हणतात की, “जेव्हा आपण दिल्लीसारख्या शहरात स्वतःचं थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून गरम कपडे घालतो त्याच वेळी सियाचीनमध्ये भारताच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी जवान उणे दहा आणि उणे 45 अंश तापमानात उभे असतात. अशा जवानांना मी सलाम करतो.”
जनरल रावत यांच्या निवृत्तीनंतर ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देशाचे पुढचे लष्करप्रमुख होतील.
15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. देशातील तिन्ही सैन्यदलांचा एक प्रमुख राहील त्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असं म्हटलं जाईल.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. देशाचे पहिले सीडीएस हे जनरल रावत होऊ शकतात असा अंदाज काही माध्यमांनी व्यक्त केला आहे. पण याबाबत कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाही.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165
_________________________________________________
_________________________________________________