👁 10 Views

किल्ले रायगड संवर्धनाच्या कामात मोठा भ्रष्टाचार… खा. संभाजी महाराज संतप्त

Pandharpur Live :  किल्ले रायगडाच्या संवर्धनाचे काम सुरू आहे परंतु या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्याने खा. संभाजी महाराज संतप्त झाले आहेत. 

संभाजी महाराजांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीनंतर संभाजी महाराजांनी माध्यमांशी संवाद साधला.

 ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची (हिंदवी स्वराज्याची) राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धानचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने 606 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संवर्धनाची काही कामं सुरळीत सुरु आहेत, मात्र महाड ते रायगड किल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.” तसेच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या रोपवेच्या कामात दिरंगाई तसेच संबंधित विभागाचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान रायगड किल्ल्यावर परवानगी नसताना देखील रोप-वेचे काम सुरु असल्याचा आरोप रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला होता. गडावर एखाद बांधकाम करायचे असल्यास त्यासाठी अनेक नाहरकतींची आवश्यकता असते, हा नियम रोप- वे वाल्यांना लागू नाही का, असा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता. रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाला आहे, असं संभाजी महाराजाचं म्हणणं आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *