👁 9 Views

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार… अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री! बघा मंत्रीमंडळाची पक्षनिहाय संपुर्ण यादी

Pandharpur Live : 
महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज झाला.  या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश आहे. आजच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. 

विधानभवनात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. आज एकूण ३६ जणांचा शपथविधी पार पडला. यामध्ये २६ जणांनी कॅबिनेट तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

खालीलप्रमाणे आहेत महाराष्ट्र सरकारचे शिलेदार 
मुख्यमंत्री 
उध्दव ठाकरे (शिवसेना) 
उपमुख्यमंत्री 
अजित पवार (राष्ट्रवादी)
मंत्रीमंडळ
कॅबिनेट मंत्री
१. एकनाथ शिंदे, शिवसेना
२. सुभाष देसाई, शिवसेना
३. बाळासाहेब थोरात, काँग्रेस
४. नितीन राऊत, काँग्रेस
५. जयंत पाटील, राष्ट्रवादी
६. छगन भुजबळ, राष्ट्रवादी
७. अशोक चव्हाण, काँग्रेस
८. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी
९. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
१०. विजय वडेट्टीवार, काँग्रेस
११. अनिल देशमुख, राष्ट्रवादी
१२. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
१३. वर्षा गायकवाड, काँग्रेस
१४. डॉ. राजेंद्र शिंगाणे, राष्ट्रवादी
१५. नवाब मलिक, राष्ट्रवादी
१६. राजेश टोपे, राष्ट्रवादी
१७. सुनिल केदार, काँग्रेस
१८. संजय राठोड, शिवसेना
१९. गुलाबराव पाटील, शिवसेना
२०. अमित देशमुख, काँग्रेस
२१. दादा भुसे, शिवसेना
२२. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी
२३. संदिपान भुमरे, शिवसेना
२४. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
२५. यशोमती ठाकूर, काँग्रेस
२६. अनिल परब, शिवसेना
२७. उदय सामंत, शिवसेना
२८. के.सी. पाडवी, काँग्रेस
२९. शंकरराव गडाख, अपक्ष
३०. असलम शेख, काँग्रेस
३१. आदित्य ठाकरे, शिवसेना
राज्यमंत्री
१. अब्दुल सत्तार, शिवसेना
२. सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस
३. शंभूराजे देसाई, शिवसेना
४. बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पार्टी
५. विश्वजीत कदम, काँग्रेस
६. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
७. आदिती तटकरे, राष्ट्रवादी
८. संजय बनसोडे, राष्ट्रवादी
९. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी
१०. राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *