👁 12 Views

पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नं.१ च्या वतीने सभासदांना भेट वस्तु वाटप

Pandharpur Live : 
पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नं.1 च्या वतीने नगरपरिषद सभागृहात मा.नगराध्यक्ष सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटनेचे अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, नगरसेविका सुप्रिया सचिन डांगे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सभासदांना भेटवस्तु म्हणुन प्रत्येकी एक आराम खुर्चीचे वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी संस्थेचे चेअरमन जयंत पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षीय सुचना संचालक सुनिल सोनार यांनी केली. त्यास अनुमोदन संचालक अनिल अभंगराव यांनी दिले. याप्रसंगी नगरपरिषद कर्मचा-यांना मा.नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सातवा वेतन आयोग लागु केल्याबद्दल ऋणनिर्देश म्हणुन नगरपरिषद कर्मचा-यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

     या प्रसंगी प्रास्ताविकमध्ये पतसंस्थेचे जेष्ठ संचालक सुनिल वाळुजकर यांनी संस्थेच्या प्रगती आढावा घेत असताना संस्थेचे स्वभांडवल रु.2 कोटी रुपये अशुन संस्थेची गुंतवणुक 1 कोटी 88 लाख रुपये आहे. तसेच जिल्ह्यातील एकमेव कर्मचारी पतसंस्थेने शतकमहोत्सव साजरा केला आहे. आतापर्यंत संस्थेने सभासदांना लाभांश सोबत चांगल्या प्रतीच्या भेटवस्तु वाटप केल्या आहेत.तसेच संस्थेने कर्ज वाटपाचे व वसुलीचे व्यवस्थितरित्या नियोजन केल्यामुळे व कर्जाच्या वसुलीसाठी सर्व नगरसेवक व पदाधिका-यांनी संस्थेस सहकार्य केले आहे. तसेच आकृती बंदामुळे नविन कर्मचारी भरती होत नसल्याने वरचे वर सभासद संख्या कमी होत आहे. यामुळे संस्थेच्या भागभांडवलावर परिणाम होत आहे. तसेच सभासद अथवा त्यांचे नातेवाईक मृत्यु पावल्यास संस्थेच्यावतीने सभासद मयत झाल्यास सभासदाच्या वारसांना रु.1500 व सभासदाचे कुटुंबातील नातेवाईक मरण पावल्यास रु.1000 पर्यंतची मदत कामगार कल्याण निधीतुन दिली जाते असे सांगितले.
     अध्यक्षिय भाषण करताना नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यांनी संस्थेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करुन संस्थेच्यावतीने सभासदांना लाभांषसोबत प्रतिवर्षी देण्यात येणा-या भेट वस्तु वाटप केल्याबद्दल व संस्थेच्या प्रगतीबद्दल संस्थेचे कौतुक केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी लक्ष्मणराव शिरसट यांनी संस्थेच्या प्रगतीचे व या उपक्रमाबद्दल संस्थेचे कौतुक करुन कर्मचा-यांच्या अडचणी वेळी आम्ही सर्व नगरसेवक कायम तुमच्या बरोबर आहोत असे आश्वासन दिले. तसेच मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका कर्मचारी पतसंस्थेने शतकमहोत्सव केल्याबद्दल कौतुक करुन संस्थेला कर्जवसुलीसाठी वेळोवेळी सहकार्य करु असे सांगुन संस्थेने सभासदांचे आर्थिक हित पाहुन संस्थेची अतिशय चांगली प्रगती केली आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सभेच्या शेवटी संस्थेच्यावतीने आभार संचालक शरद वाघमारे यांनी मानले, याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी राणी गायकवाड, व्हा.चेअरमन विनायक भांगे, संचालक प्रितम येळे, तानाजी अधटराव, धनंजय वाघमारे, लक्ष्मी हुंडेकरी, तज्ञसंचालक दिनेश साठे व नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *