👁 6 Views

पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये रक्तदान शिबीर, रोटरी क्लब पंढरपूर व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम

पंढरपूर: प्रमोद बनसोडे

राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने एन. एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील राष्ट्रीय सेवा योजना व पंढरपूर रोटरी क्‍लबच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ रोजी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे, सिंहगड काॅलेजचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डीन डाॅ. चेतन पिसे, डॉ. उदय पाटील, प्रा. निशा करांडे, प्रा. गणेश लकडे, प्रा. अमोल कांबळे, प्रा. अजय मासाळ, विद्यार्थी प्रतिनिधी नागेंद्रकुमार नायकुडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.


  यादरम्यान रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे सर यांचा अक्षय ब्लड बॅकेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

   राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी १०३ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला. या शिबिरामध्ये अक्षय ब्लड सेंटर पंढरपूर यांचे सहकार्य लाभले.


  हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अक्षय ब्लड बॅकेचे जनसंपर्क अधिकारी अजय रूपनर, स्वप्नील शिंदे, विष्णु मोरे, निकीता गावडे, तुळशीदास आयगोळे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, विद्यार्थी प्रतिनिधी नागेंद्रकुमार नायकुडे, बापु माने सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसह रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांनी परीश्रम घेतले.


फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड मध्ये रक्तदान शिबीर प्रसंगी डाॅ. कैलाश करांडे सोबत इतर मान्यवर.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *