👁 9 Views

मोठी बातमी- खातेवाटपाचं ठरलं… बघा संभाव्य खातेवाटपाची यादी!

Pandharpur Live : 
महाविकास आघाडीच्या सरकारचे खातेवाटप महिन्याभरानंतर झाले. मात्र अजूनही मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्यातरी ३६ मंत्री बिनखात्याचे मंत्री म्हणूनच आहे. दरम्यान संभाव्य खातेवाटपाची यादी समोर आली आहे. काल बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत खातेवाटप निश्चित झाले असून आज गुरुवारी संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवीन वर्षांत संवाद महत्त्वाचा असल्याने विकास कामांवर चर्चा झाली. जनतेच्या विविध प्रश्नांवरती मार्ग काढण्यासंदर्भात आज बैठकीमध्ये साधक-बाधक चर्चा झाली. जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपासंदर्भातही चर्चा झाली. उद्या गुरुवारपर्यंत खातेवाटप जाहीर व्हायला काही अडचण नाही असे पवार म्हणाले.

खाते वाटपावरून वाद विवाद आहेत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. खातेवाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तीन पक्षांचा आणि मित्र पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार त्यामुळे चर्चा करूनच निर्णय झाला आहे. उद्या संध्याकाळी खातेवाटप होईल आणि पालकमंत्री नेमले जातील, असा निर्णय आज बैठकीत झाला आहे असे ते म्हणाले.

संभाव्य खातेवाटपाची यादी-
शिवसेनेच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटपः
एकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम
सुभाष देसाई- उद्योग आणि खनिकर्म
अनिल परब- सीएमओ
आदित्य ठाकरे- पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण
उदय सामंत- परिवहन
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संभाव्य खातीः
अनिल देशमुख- गृह खातं
अजित पवार- अर्थ आणि नियोजन
जयंत पाटील- जलसंपदा
दिलीप वळसे पाटील- कौशल्य विकास आणि कामगार
जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण
नवाब मलिक- अल्पसंख्यांक
हसन मुश्रीफ- सहकार
धनंजय मुंडे- सामाजिक न्याय
काँग्रेसच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप:
बाळासाहेब थोरात- महसूल खातं
अशोक चव्हाण- सार्वजनिक बांधकाम

दालन तसेच बंगले वाटपाबाबतही चर्चा

कोणत्या मंत्र्यांना कोणते दालन तसेच बंगले द्यायचे याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. याबाबत निर्णयही झाले असून ज्येष्ठतेनुसार बंगले तसेच दालने ठरली आहेत. त्याचेही वाटप उद्या जाहीर होईल, असे अजित पवार म्हणाले.

मागण्याचा प्रत्येकाला अधिकार, पण तुटेपर्यंत ताणायचे नाही!

प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे, पण कुठपर्यंत मागायचे यालाही मर्यादा आहेत. तुटेपर्यंत ताणायचे नसते, असा टोला काँग्रेसला लगावतानाच अजित पवार म्हणाले, प्रत्येकाने आपली मागणी मांडली आहे. आता त्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. राष्ट्रवादीने गृहमंत्रीपदाची मागणी केली आहे का यावर ते म्हणाले, राष्ट्रवादीकडे कोणती खाती घ्यायची याचे अधिकार अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार जयंत पाटील आणि मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून याबाबचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *