👁 10 Views

राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत पंढरपूर सिंहगडचा शुभंकर दामोदरे द्वितीय

Pandharpur Live : 
पंढरपूर (प्रतिनिधी) तालसाधना सोलापूर यांच्या वतीने कै. दत्तात्रय कुलकर्णी स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय स्वतंत्र तबलावादन स्पर्धा २५ डिसेंबर रोजी सोलापूर येथे  आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी कुमार शुभंकर दामोदरे यांनी द्वितीय क्रमांक मिळाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
   या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, विजापूर, पंढरपूर आदी ठिकाणाहून तबलावादन विद्यार्थ्यांनी मोठ्या गटात सहभागी झाले होते.
राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील चतुर्थ वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी श्री. शुभंकर दामोदरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
या स्पर्धेसाठी पुणे येथील पांडुरंग मुखडे आणि मुंबई येथील रूपक पवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शुभंकर दामोदरे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. प्रसाद कुलकर्णी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *