👁 7 Views

समाजसेवेसाठी प्रशिक्षण घेणारे दुर्लभच – सचिव डॉ. बी.पी. रोंगे

Pandharpur Live : 
स्वेरीत भारतीय किसान संघाच्या कार्यकर्ता अभ्यास प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन
पंढरपूर- ‘उद्योगासाठी, नोकरीसाठी किंवा स्वविकासासाठी प्रशिक्षण वर्ग सर्वत्र होत असतात परंतु समाज सेवेसाठी, विकासासाठी निस्वार्थ भावनेने प्रशिक्षण घेण्यास आलेले कार्यकर्ते पाहून मला कौतुक वाटते असे दुर्लभ कार्यकर्ते किसान संघाकडे आहेत. यावरून हे निश्चित दिसत आहे की भविष्यात भारतीय किसान संघ महाराष्ट्रातील शेती व शेतकऱ्यांचे चित्र पालटून टाकेल व या महान कार्यास माझ्या हृदयापासून शुभेच्छा.’असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
       गोपाळपूरच्या स्वेरीमध्ये आयोजिलेल्या भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या ‘कार्यकर्ता अभ्यास प्रशिक्षण वर्गाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. रोंगे हे मार्गदर्शन करत होते. आजपासून सलग तीन दिवस किसान संघाचा तीन दिवसीय अभ्यासवर्गाला सुरवात झाली. यामध्ये गोवा व महाराष्ट्र राज्यातील २५ जिल्ह्यामधून जवळपास साडेतीनशे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने अभ्यास वर्गाचे प्रास्तविक भाकिसं महामंत्री मदन देशपांडे यांनी केले. ते म्हणाले ‘कोणत्याही संघटनेचे ध्येय साधण्यासाठी त्याचा कार्यकर्ता किती कुशल, प्रभावी आहे यावर ते अवलंबून आहे. म्हणून कार्यकर्त्याला प्रशिक्षित करण्यासाठी, बौद्धिक व्याख्याने, गट चर्चासत्रे, सादरीकरण व अभिरूप नाट्य या माध्यमातून या वर्गात शिक्षित केले जाईल. खूप प्रयत्न व अडचणी आणि अडथळ्यावर मात करून कार्यकर्ते इथंपर्यंत पोहचले आहेत. ते विविध प्रकारचे कौशल्य प्राप्त करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात सौख्याचे दिवस आणण्यास अहोरात्र झटतील. या निमित्ताने किसान संघाचे संस्थापक कै. दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्म शताब्दीचे वर्ष आहे म्हणून अजित पराजंपे लिखित ‘दृष्टा तत्वचिंतक दत्तोपंत’ या चरित्र पुस्तकाचे प्रकाशन भाकिसं अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी व डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रांताध्यक्ष बळीराम सोळंखी, प्रदेश संघटनमंत्री दादा लाड, लेखक अजित परांजपे, महामंत्री मदन देशपांडे, हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत प्रांत उपाध्यक्ष रावसाहेब शहाणे-पाटील यांनी स्मृतीचिन्ह देवून केले. सुत्रसंचालन व वक्त्यांचा परिचय श्रीरंग जांभळे यांनी करून दिला तर जिल्हामंत्री अॅड मनोज व्यवहारे यांनी आभार मानले.
छायाचित्र- स्वेरीमध्ये भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या ‘कार्यकर्ता अभ्यास प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन झाले. याप्रसंगी अजित पराजंपे,  संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी, प्रांताध्यक्ष बळीराम सोळंखी, प्रांत उपाध्यक्ष रावसाहेब शहाणे-पाटील आणि स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, प्रदेश संघटनमंत्री दादा लाड,
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *