👁 11 Views

ठेकेदारांकडून टक्केवारी मागणा-या 22 आमदार-खासदारांविरोधात गडकरींची सीबीआयकडे तक्रार

पंढरपूर Live –
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ठेकेदारांवर दबाव टाकणार्‍या आमदार तसेच खासदारांविरुद्ध केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार केली आहे. गडकरी यांनी सीबीआयच्या निदेशकांकडे जवळपास 22 नावांची यादी सोपविली असून, या सर्वांविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे. दस्तुरखुद्द मंत्र्यांकडून तक्रार असल्याने सीबीआयकडून या आमदार, खासदारांविरुद्ध लवकरच कठोर पावले उचलली जाऊ शकतात.

आपापल्या मतदारसंघात काम करण्याच्या मोबदल्यात ठेकेदारांकडून टक्केवारीची अपेक्षा करणार्‍या तसेच त्यासाठी ठेकेदारांना त्रास देणार्‍या आमदार, खासदारांवर गडकरी कमालीचे नाराज आहेत.

प्राप्त माहितीनुसार गडकरी यांनी सीबीआय निदेशकांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि हा सगळा विषय त्यांच्या पुढ्यात ठेवला.
मराठवाडा, कोकण, पुणे विभागातील आमदारांची नावे?
औरंगाबाद येथील रस्त्याच्या संदर्भात एका ठेकेदाराशी झालेल्या बोलण्यातून हा विषय गडकरी यांच्यासमोर आला.विदर्भ, मराठवाडा, पुणे तसेच कोकण विभागातील आमदारांची नावे या यादीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या आमदारांकडे बोट दाखवताना मराठवाड्यातीलच कार्यक्रमात गडकरींनी स्पष्ट सांगितले होते की, हे टक्का मागणारे आमदार विदर्भातले वगैरे नाहीत. मी मराठवाड्यातल्याच आमदारांची गोष्ट करतोय.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *