👁 9 Views

पंढरपूर तालुका- जावयाच्या घरावर महिलेच्या माहेरच्यांचा हल्ला… गंभीर मारहाणीत सासुचा मृत्यू… कासेगाव येथील खळबळजनक घटना

पंढरपूर (प्रतिनिधी)- मुलीला त्रास देतात, नांदवत नाहीत, जाचहाट करतात म्हणून मुलीच्या माहेरच्या लोकांनी जावयाच्या घरावर हल्ला करत जावयाला व त्याच्या आईला जबर मारहाण केली.  या घटनेत मुलीच्या सासुचा मृत्यू झाला असल्याची खळबळजनक घटना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव मध्ये घडली आहे.

पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार फिर्यादी शहाजी नारायण गुंड (रा.गुंडवस्ती, देशमुख वस्ती, कासेगाव) या जावयाने पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी बळीराम गांडुळे (सासरा), श्रीकांत गांडुळे, दत्तात्रय  गांडुळे,  लक्ष्मण गांडुळे,  चिमाजी गांडुळे,  हणुमंत गांडुळे,  नाना गुंड, सोमनाथ गांडुळे,  समाधान गांडुळे (सर्व राहणार तनाळी रोड, देशमुख वस्ती, कासेगाव) यांनी दि. 21-1-2020 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चे घरावर हल्ला केला व फिर्यादीस लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच श्रीकांत गांडुळे याने फिर्यादी च्या आईस पाठीवर, हातावर व पोटावर मोटार केबल, पाईप ने जबर मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यांच्या अंगावरील सोन्याचे 3 तोळ्याचे गंठण, बोरमाळ, व फिर्यादीचा मोबाईल हिसकावून नेला. 

सदर मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुनिता नारायण गुंड यांचा दि. 21-1-2020 रोजी 10:55 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींविरुध्द भादंवि 302, 329, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सपोनी ओलेकर हे करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *