👁 4 Views

पंढरीत उद्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

पंढरपूर लाईव्ह – महाराष्ट्र राज्य ‘मराठा सोयरिक’ ग्रुपच्या वतीने भव्य राज्यस्तरीय विनाशूल्क वधु-वर परिचय मेळाव्याचे उद्या रविवार दि.2 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत श्री संत जगत्‌गुरू तुकाराम महाराज मंगल कार्यालय इसबावी, जुना अकलूज रोड, पंढरपूर येथे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या विवाहनुरूप मुला-मुलींसह उपस्थित रहावे, असे आवाहन केले आयोजकांनी आहे.



विवाह जमविणे सध्याच्या काळात मोठी समस्या बनली आहे. या संधीचे सोने करून घेण्यासाठी व्यावसायिक वधु-वर सूचक मंडळानी विवाह जुळविण्यासाठी दलालांनी कंबर कसली आहे. गरजवंत वधू व वर पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारून त्यांची लूट करण्याचा धंदा अनेकांकडून केला जात आहे. या लुटमार फसवणूक करणाऱ्याची गय न करता त्यांना धडा शिकविणार असल्याचे महाराष्ट्र मराठा सोयरिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जवंजाळ पाटील (बुलढाणा) यांनी वधू-वर सुचक मंडळाच्या माध्यमातून गरजवंत पालकांची फसवणूक करणाऱ्या दलालांना पायबंद बसणार आहे. यासाठी विनाशूल्क वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या बैठकीस अभिजीत पाटील, राजेंद्र कोरके-पाटील, डॉ.उदयसिंह पवार, रामदास गाजरे, संदिप गाजरे, विजय घालमे, दत्तात्रय यादव, राजेंद्र गुड, रविंद्र माने, नंदकुमार सटाले, दत्ताजीराव पाटील यांच्यासह मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *