Pandharpur Live Online –
यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक यांनी सांगितले कि, पंढरपूर शहर कचरा मुक्त व कुंड मुक्त व्हावे ह्या हेतुने शहरामध्ये घंटागाडी चालु करण्यात आले आहे. या पुर्वी असणा-या घंटागाडीमध्ये प्लँस्टिचे ड्रम ठेवुन कचरा गोळा करण्यात येत होता परंतु ओळा व सुका कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या म्हणुन नगरपरिषदेने या वर्षी घंटागाडीचा ठेका देताना खास ओला व सुका कचरा गोळा करणारी घंटागाडी असणे आवश्यक केल्याने या नव्या आधुनिक घंटागाड्या ठेकेदाराने खरेदी केल्या आहेत यामुळे शहरातील ओला व सुका कचरा वेगळा करण्यात मदत होणार आहे. तरी पंढरपूर शहरातील नागरीकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी तसेच कचराकुंड व कचरा मुक्त होणाच्या दृष्टीने आपल्या घरातील ओला व सुका कचरा घंटागाडीतच टाकावा कोणत्याही परिस्थित कचरा रस्यावर टाकु नये असे आवाहन केले. या वेळी नगरसेवक सुजित सर्वगोड संजय निंबाळकर,आदित्य फत्तेपुरकर,नगरसेविका सुप्रिया डांगे ,शंकुतला नडगिरे , ,मालोजी शेंबडे अमोल डोके, आरोग्याधिकारी डॉ संग्राम गायकवाड, आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे व नागनाथ तोडकर , वरिष्ठ लिपीक अनिल अभंगराव, धर्मराज घोडके ,बसवेश्वर देवमारे , आरपीआय चे शहराध्यक्ष संतोष पवार नरेंद्र डांगे , हे उपस्थित होते.


