पंढरपूर (प्रतिनिधी) :- पंढरपूर शहरामध्ये अन्नपूर्णा पंढरपूर व लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम यांच्या वतीने पंढरपूर महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात येणार आहे. सदर पंढरपूर महोत्सवाचे शुक्रवार दिनांक १४ एप्रिल २०२३ ते मंगळवार दिनांक १८ एप्रिल २०२३ या कालावधीत कंडरेज रेसिडेन्सी, पुणे (पालखी) रोड, ईसबावी, पंढरपूर येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
दरम्यान पंढरपूर महोत्सवातील आयोजक अन्नपूर्णा पंढरपूर यांच्या वतीने दिनांक ६ मे २०२२ पासून कैलासवासी प्रल्हाद आबा कंडरे यांच्या प्रथम पुण्यतिथी पासून पंढरपूर येथे अजित दादा कंडरे आणि मित्रपरिवार यांनी अन्नपूर्णा पंढरपूर या योजनेचा शुभारंभ केला आहे आणि न चुकता दररोज जेवणाचे २५ मोफत डबे गरजूंना घरपोच केले जात आहेत.
या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा त्यांचा भविष्यातील मानस आहे. तसेच लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम या जागतिक पातळीवरील सेवाभावी संस्थेमार्फत डोळ्यांच्या व्याधी असलेल्या गरीब गरजू रुग्णांच्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी डोळ्यांचा दवाखाना सुरू करण्याचे ही प्रयोजन यांच्यामार्फत करण्याचा विचार आहे त्यासाठीच महोत्सवातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा संपूर्ण भाग वापरला जाणार आहे.
या महोत्सवामध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले जाणार आहेत तसेच फॅशन, दागिने, कपडे, खेळणी, संसारोपयोगी वस्तू , शैक्षणिक साहित्य, आटोमोबाइल, ट्रॅक्टर्स, खेळाचे साहित्य यांचेही स्टॉल्स लावले जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातला ताजा व निरोगी शेतमाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने येथे शेतीमालासाठी स्टॉल लावले जाणार आहेत. शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे, पशु आहार, रासायनिक व नैसर्गिक खते यांचे स्टॉल्स येथे प्रदर्शन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. या महोत्सवाच्या कालावधीत जत्रा स्टॉल्स उभा करून मनोरंजनात्मक खेळ जे बालपणीच्या काळात खेळले गेले होते, तोच अनुभव नवीन पिढीला देऊन आपलं बालपण जगण्याचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हे बनविण्यात आलेले आहेत. तसेच या महोत्सवात कंपनीचा लोगो थीम असलेली सेल्फी पॉईंट उपलब्ध करून दिले गेलेले आहेत.
पंढरपूरकरांसाठी महोत्सवामध्ये विविध संस्कृतीक कार्यक्रमाची भरगच्च मेजवानी!
पंढरपूर महोत्सवांतर्गत नवीन व होतकरू कलावंताच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी लावणी स्पर्धेचे व कुठल्याही वयाची मर्यादा व स्त्री पुरुष सर्वांसाठी समान व निरपेक्ष पणे घेतली जाणारी फॅशन स्पर्धा येथे उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे प्रथमतः पंढरपुरामध्ये महिलांच्या कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत. महिलांच्या कुस्त्या हा विषय तसा महाराष्टत नवीनच आहे, या तुन आपल्या जिल्यात,गावात काही मुली नक्कीच प्रेरणा घेऊन पुढील काळात कुस्ती क्षेत्रात नाव कमावतील, पंढरपूर शहरांमधील विविध क्षेत्रातील नामांकित लोकांच्या पंढरपुरा विषयी व पंढरपुराच्या प्रगती विषयी काय भावना आहेत याबद्दलच्या मते व्यक्त करणारा टॉक शो ही पंढरपूर व्हीजन नावाखाली आयोजित करण्यात आलेला आहे. लहान थोर सर्वांच्या मनोरंजन व खेळण्यासाठी पाळणे, झोके आणि गमतीदार राईड सज्ज आहेत.
आपण पाच वर्षा पूर्वी पंढरपुरामध्ये पुरुष आणि स्त्रिया या दोघांच्याही शरीर सौष्ठव स्पर्धा कंडरेज फिटनेस हब (KFH) च्या माध्यमातून घेतल्या होत्या त्याच धर्तीवर मोट्या प्रमाणात या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या आहेत. पंढरपूर महोत्सव सर्वांसाठी महोत्सव या भावनेने सुरू करण्यात आलेला आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश कलाकारांना, खेळाडूंना, उद्योजकांना, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हाच आहे, म्हणून आपण जास्तीत जास्त स्पर्धा भरवण्यावर भर दिला आहे. तसेच उद्योजक व व्यावसायिक यांना आपल्या वस्तू , उत्पादनाच्या विक्री व जाहिरातीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत , इच्छुकांनी स्टॉल्स व जाहिरातीच्या नोंदणीसाठी आयोजकांशी संपर्क करावा , असे अहावान करण्यात आले आहे .
पंढरपूर महोत्सवात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून हा महोत्सव यशस्वी करावा अशी भावना आयोजक कोर कमिटी मेंबर कु. पायल (यलमार) कंडरे, सौ. स्वाती कंडरे -विभूते, लायन. ललिता कोळवले, अजित यलमार कंडरे, गणेश पाटील, तानाजी सालविठ्ठल, जाकीर भाई मुलाणी, मार्गदर्शक श्री अरुण आण्णा कंडरे आणि सर्व सहकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.
चौकट :
पंढरपूर शहर व तालुक्यातील ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन व व्यवसायाच्या नवीन संधी मिळवून देणे व सोबतच नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने पंढरपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .
– पायल अजित कंडरे , निमंत्रक पंढरपूर महोत्सव
मान्यवरांच्या हस्ते पंढरपूर महोत्सव लोगोचे अनावरण संपन्न
पंढरपूर महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ” पंढरपूर महोत्सव ” या नावाचा व त्यासोबत असलेल्या लोगोच्या प्रतिकाचा उद्घाटन समारंभ १६ मार्च २०२३ रोजी कंडरे रेसिडेन्सी इसबावी येथे सायं ७.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील सामाजिक,राजकीय,औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार,शेती क्षेत्र व इतर छोटे मोठे व्यावसायिक स्त्री-पुरुष ,गृहिणी या सर्वांची उपस्थिती होती.




