पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
पोटचेफ्स्टूम : सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकी आणि दिव्यांश सक्सेनाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या साामन्यात पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १० विकेटनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. यशस्वी जैस्वाल सामन्याचा मानकरी ठरला.
विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३५.२ षटकात बिनबाद १७६ धावा करत सहज पूर्ण केले. भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने ११३ चेंडूत ८ चौकार व ४ षटकारासह नाबाद १०५ तर दिव्यांश सक्सेनाने ९९ चेंडूत ६ चौकारासह ५९ धावांची खेळी करत भारतीय संघास विजय मिळवून दिला.
Posted inPandharpur Live News





