महाड । वडील दारू पिऊन सतत शिवीगाळ करीत असल्याने त्यांच्या जाचाला कंटाळून महाड येथील एका 22 वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या केली. सिद्धीका संदीप चव्हाण असे या मृत तरुणीचे नाव आहे.
भावे- चौधरी वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली.
उंदराचे (रेक्टोल) औषध प्यायली आहे, असे सिद्धीका हिने मृत्यूपूर्वी जबाब दिला. सिद्धीका हिला उलट्याचा त्रास होऊ लागल्याने तिला प्राथमिक उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले.
दरम्यान, सद्धीका हिची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे तिला अधिक उपचाराकरिता मुंबई येथील जे जे रुग्णालय येथे पाठविण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने तिचा मृत्यू झाला.



