👁 5 Views

सोलापूर: बनावट विमा पॉलिसीतून चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीची तीन कोटींची फसवणुक

 

सोलापूर: चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळाचा वापर करून आणि या कंपनीचे एजन्ट असल्याचे भासवून बनावट विमा पॉलिसी तयार केली आणि त्यातून कंपनीची दोन कोटी ९३ लाख ६९ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सोलापुरात घडला.


याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


हा फसवणुकीचा गोरख धंदा विजापूर रस्त्यावरील नवीन आरटीओ कार्यालयाजवळील सिध्दार्थ आॕनलाईन सर्व्हिसेस या केंद्रात मागील वर्षभर राजरोसपणे सुरू होता.


 यात डफरीन चौकातील चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीच्या शाखेशी संबंधित कर्मचारी प्रदीप सावंत याचाही सहभाग आढळून आला आहे. चोलामंडम जनरल इन्शुरन्स कंपनीच्या फसवणूक नियंत्रण युनिटचे सहायक सरव्यवस्थापक विनय रामकृष्ण मंत्री (रा. अहमदाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिध्दार्थ आॕनलाईन सर्व्हिसेसचा अजय कोरवार आणि प्रदीप सावंत या दोघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *