👁 6 Views

शिरगावच्या सरपंचाचा धारदार हत्याराने वार करून खून

 

पिंपरी : मावळ तालुक्यातील शिरगावचे विद्यमान सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७, रा. खळवाडी, शिरगाव) यांचा तिघांनी धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना शिरगाव येथे शनिवारी (ता.१) रात्री घडली.


गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध सरपंच म्हणून त्यांची निवड झाली होती. शनिवारी रात्री शिरगाव येथील साई मंदिरासमोर ते मित्रांसह गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात हत्याराने वार करीत हल्ला चढवला केले.


यामध्ये गोपाळे गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोपाळे यांना तातडीने रुग्णालतात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले..हा खून कोणत्या कारणावरून झाला.


 हल्लेखोर कोण आहेत, हे अद्याप समजू शकले नाही. गोपाळे हे जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. शिरगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *