👁 8 Views

स्वेरीज् फार्मसीमध्ये गेस्ट लेक्चर संपन्न

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘कम्युनिटी फार्मासिस्ट’ प्रा. चित्रा सरकार, सोबत बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल व विद्यार्थी.

स्वेरी फार्मसीमध्ये झालेल्या गेस्ट लेक्चरमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ‘कम्युनिटी फार्मासिस्ट’ प्रा. चित्रा सरकार यांचे स्वागत करताना बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल सोबत यावेळी स्वेरीचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, सौ. नाडगौडा.


Pandharpur Live-
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूर संचलित कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूरमध्ये तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चरचे आयोजन केले होते.
          यावेळी ‘बेल युनिव्हर्सिटी स्वित्झर्लंड येथे ‘कम्युनिटी फार्मासिस्ट’ म्हणून काम करणारे प्रा. चित्रा सरकार हे उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. रामदास नाईकनवरे यांनी हा सेमिनार आयोजन्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी बोलताना चित्रा सरकार यांनी कम्युनिटी फार्मासिस्टची भूमिकात्याची कर्तव्यइत्यादी बद्दलची मूलभूत माहिती दिली. कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणून काम करत असताना कोणत्या गोष्टी प्राधान्याने पाहिल्या पाहिजेतपेशंट कौन्सिलिंग कसे केले पाहिजेरुग्णाना औषधे कशी द्यावीतमेडिकेशन हिस्टरी का गरजेची आहे, पेशंट कौन्सलिंग कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. पेशंट कौन्सलिंग करत असताना त्यांना द्यावी लागणारी विविध माहिती औषधेऔषधांची मात्रात्याचे दुष्परिणामरुग्णांनी औषध घेण्याच्या पद्धती, मधुमेहउच्च रक्तदाब तसेच दमा या आजारांना आजारांमध्ये उपयोगी असले सेल्फ डायग्नोस्टिक कीट बद्दलची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. 

याचबरोबर स्वित्झर्लंड येथे कार्य करत असलेल्या कामाची माहिती बरोबरच भारतीय आणि विदेशी पद्धतींमध्ये ‘फार्मासिस्ट’च्या भूमिकेमध्ये असलेले वेगवेगळे फरककामे, जबाबदारी आदींची सविस्तर माहिती प्रा. सरकार यांनी समजावून सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, सौ. नाडगौडा यांच्यासह स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, डॉ. मिथुन मणियारप्रा. वृणाल मोरे, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी  उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *