👁 8 Views

शिवजंयती निमित्त स्वेरीतील २७५ विद्यार्थ्यांनी केले ऐच्छीक रक्तदान स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम

Pandharpur Live-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंती निमित्त स्वेरीच्या इंजिनिअरिंग व फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेअतंर्गंत घेतलेल्या रक्तदान शिबिरात एकूण २७५ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी महाराष्ट्राच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ना. शेखर चरेगांवकर संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगेसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगेविश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एन. हरिदास व प्रा. महेश मठपती, प्राध्यापक व आदी.

पंढरपूर- गोपाळपुर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित इंजिनीअरिंग व फार्मसी अंतर्गत असलेल्या व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजिलेल्या रक्तदान शिबीरात अभियांत्रिकी पदवीच्या २०० विद्यार्थी तर अभियांत्रिकी पदविकेच्या ७५ विद्यार्थी असे मिळून स्वेरीतील एकूण २७५ विद्यार्थीविद्यार्थींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  ऐच्छीक रक्तदान केले.



         ‘शिवजयंती’ म्हणजे तरुणांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. सर्वजण शिवजयंती साजरी करताना अनेक विधायक उपक्रम राबवितात. यामध्ये स्वेरी देखील मागे नाही. स्वेरी अंतर्गत असलेल्या पदवी अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजनेअतर्गंत ऐच्छीक रक्तदान शिबीर राबविण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीचे रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एन. हरिदास व प्रा. महेश मठपती तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्रा. सुनील भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली शिवजंयतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर राबविले. स्वेरी अंतर्गत असणाऱ्या पदवी अभियांत्रिकीच्या २०० व पदविका अभियांत्रिकीच्या ७५ विद्यार्थ्यांनी अशा एकूण २७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. 

यावेळी पंढरपूर ब्लड बँक व सोलापूर ब्लड बँक या रक्तपेढयांना पाचारण करण्यात आले होते. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी प्रसाद खाडीलकर व उत्तम गायकवाड व त्यांचे कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्वेरीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. रक्तदानाच्या ठिकाणी शिवजयंतीचे पाहुणे महाराष्ट्राच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जाचे) ना. शेखर चरेगांवकर,संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगेसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगेविश्वस्त बी.डी.रोंगेविश्वस्त प्रा. सुरज रोंगेस्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटील, फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पातइतर अधिष्ठाता, विभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी आदींनी देखील भेट देवून पाहणी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *