👁 11 Views

लांच्छनास्पद- स्वत:च्या जन्मदात्या आईलाच नग्न करुन करायची मारहाण!

Pandharpur Live Online- स्वत:च्या जन्मदात्या आईवर तिच्याच मुलीने अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना कंदिवली येथील लोखंडवाला येथे घडली आहे. 70 वर्षीय आईचा मानसिक आणि शारिरीक छळ ती करीत होती. याप्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात पालक तसेच ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण आणि देखभाल, कायदा २००७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याच जन्मदात्या आईला ती मुलगी उपाशी ठेऊन तीला नग्न करून मारहाण करीत असे. याप्रकारची तक्रार त्या वृद्ध महिलेने पोलिसांत केली आहे.



सौदामिनी (बदललेलेनाव) गेल्या अनेक वर्षांपासून लोखंडवाला येथील रहिवासी आहे. त्या एमटीएनएल कामाला होत्या. त्यांचे पती आयकर अधिकारी होते. कामिनी यांना पाच मुली आहेत. पाचही मुलींची लग्न झाली आहेत.त्यातील एक मुलगी दामिनी यांच्यासोबत रहाते. गेल्या काही वर्षापासून त्यांच्या संपत्तीवरून त्यांच्या कुटूंबात वाद सुरू होते. या वादामुळे त्यांच्यासोबत राहणाऱ्या मुलीचे आणि त्यांचे संबध कटू झाले. याचा संताप डोक्यात ठेऊन त्या मुलीने आपल्या आईचा म्हणजेच दामिनी यांचा छळ करणे सुरू केले. वादा काही वेळा इतका टोकाला गेला की, एकदा जमिनीवर पाडून तीच्या मुलीने दामिनी यांना मारहाण केली होती. त्यावेळी त्या फ्रक्चर झाल्या होत्या. त्यांनी दिलेल्या पोलिस तक्रारीत असा उल्लेख आहे.


सौदामिनीची मुलगी तिला दिवसातून कधीतरी एकदा खायला देऊ लागली, तीला सतत उपाशी ठेऊ लागली. दामिनी अंघोळ करायला गेली असताना नग्न ठेऊन मारहान करत होती. दामिनी कडे असलेले आर्थिक व्यवहाराची साधने म्हणजेच डेबिट, कार्ड आधार कार्ड, चेकबुक हिसकावून घेतली. नेहमीची मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून सौदामिनी यांनी अखेर पोलिसांत तक्रार दिली. पोटच्या मुलीने एवढा त्रास दिल्याने पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आले होते. त्यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *