👁 5 Views

संभाजी नगर: तरुणीच्या डोक्यात बिअरच्या बॉटलने वार

 

छत्रपती संभाजीनगर : अश्लील शेरेबाजी केल्याने संतापलेल्या तरुणीने तरुणाच्या कानशिलात लगावल्यानंतर तरुणाने चक्क तिच्या डोक्यात बिअरची बॉटलने वार केल्याने या हल्ल्यात २६ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ मार्चच्या रात्री पावणे दहा वाजेदरम्यान विमानतळासमोरील हॉटेल निसर्ग येथे घडली.


याप्रकरणी तरुणाविरुध्द एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल पंढरी राठोड (वय २६, रा. जयभवानीनगर, गल्‍ली क्र.२, मुळ रा. शेळवणी, ता.देगलूर, जि.नांदेड) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तर भारत शेसु जाधव (३७, रा. चिकलठाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.


सदर तरुणीच्या फिर्यादीनुसार ३१ मार्चच्या रात्री साडेसात वाजेदरम्यान २८ वर्षीय मैत्रिणीसोबत विमानतळ परिसरातील निसर्ग हॉटेलमध्ये गेले होते. दरम्यान शितल हिने मित्र सोमिनाथला जेवणासाठी बोलाविले. तो आठ वाजता आल्यानंतर त्याच्यासोबत तिघेजण आलेले होते. त्यावेळी सोमिनाथने मित्रांना शीतलची ओळख करुन देत असतानाच सोमिनाथला मित्र ‘तु हिच्या नादी कशाला लागला’ म्हणतात शीतलविषयी अश्लील शेरेबाजी केली.

दरम्यान, शीतलने रागाच्या भरात शेरेबाजी करणाऱ्या सोमिनाथच्या मित्राच्या कानशिलत लगावली. यानंतर कानशिलात लगावल्याचा राग मनात धरुन सदर तरुणाने शीतलच्या डोक्यात बिअरची बॉटल फोडून जखमी केले. शीतलच्या मैत्रिणीने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केला


त्यानंतर शीतलने दुसरा मित्र सोनू खंडागळे (रा. दिवाण देवडी) याला बोलावून घेत पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानंतर सोमिनाथच्या मित्राविरोधात एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हवालदार राजधर शेजूळ करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *