⭕ *पंढरपूर सिंहगडच्या यशात मानाचा तुरा*⭕
कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या वक्ता दशसहस्ञेपु या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात द्वितीय वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या कुमारी उमा गायकवाड हिने मुंबई येथे १४ मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अंतीम वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करून पंढरपूर सिंहगडच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
“वक्ता दशसहस्ञेपु” या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी १० स्पर्धक सहभागी झाले होते.
दिनांक १४ मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या महाअंतिम स्पर्धेत उमा गायकवाड हिने उत्तम प्रकारे वक्तृत्व सादरीकरण करून यश संपादन केले आहे.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना देखील मराठी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेत उमा गायकवाड हिने स्वतःकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून मराठी भाषेतून विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केले आहे.
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजीत वाडेकर, प्रा. अजिंक्य गायकवाड सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.


