👁 5 Views

वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसले ; ११ वर्षीय बालिका ठार …..

 

आमडदे, जि.जळगाव : वाळूचे ट्रॕक्टर घरांमध्ये घुसल्याने ११ वर्षीय बालिका ठार झाली.


तर बालिकेच्या बहिणीसह शेजारील महिला जखमी झाली. ही थरारक घटना आमडदे ता. भडगाव येथे बुधवारी पहाटे ५.३० वाजता घडली.


घटनेनंतर ट्रॕक्टरचालक पसार झाला आहे. आमडदेनजीक वलवाडी रस्त्यावर गरीब वस्तीतील लोक सकाळी झोपेत होते. त्याचवेळी वाळूचे ट्रॕक्टर तीन ते चार घरांमध्ये घुसले. 

त्यात वैशाली बालू सोनवणे (११) ही बालिका जागीच ठार झाली. तिची बहीण पिंकी सोनवणे (५) आणि घराशेजारी राहणारी बानूबाई वाघ (४४) या जखमी झाल्या. जखमींंना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, वाळू माफियांवर कार्यवाही जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी कुटुंबातील सदस्य व गावकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *