👁 5 Views

गेल्या 10 दिवसापासुन पंढरीतील हा युवक पोलीस बांधवांना पुरवतोय चहा, नाष्टा आणि स्वच्छ पाणी!

पंढरपूर Live प्रतिनिधी- जगभरात कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे लोक हवालदिल झालेले आहेत. आपल्या देशात संचारबंदी लागु झालेली आहे. या परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालुन पोलीस बांधव आपले कर्तव्य चोख बजावताना आढळत आहेत. ड्युटीवर कर्तव्य बजावणार्‍या पोलीस बांधवांना पंढरीतील निलेश माने हा युवक गेल्या 10 दिवसापासुन सकाळचा चहा, नाष्टा व पिण्याचे स्वच्छ बिस्लेरीचे पाणी पुरवताना आढळत आहे.


         मार्च महिना आहे या महिन्यात भयाण उन्ह व उष्णता असते. पण आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस प्रशासन अहोरात्र झटत आहे. 24 तास ऑन ड्युटी वर पोलीस कर्मचारी आहेत. संचारबंदी मुळे कोणतेही हॉटेल, दुकान, उघडे नाहीत त्यामुळे पोलीस बांधवांना पाणी, चहा, नाष्टा, जेवण भेटत नाही. त्यामुळे आम्ही पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशनच्या वतीने पंढरीतील कर्तव्य बजावणार्‍या सर्व पोलीस बांधवांना वरीलप्रमाणे सुविधा देत आहोत. अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी दिली. 

तहान-भुक हरवुन पोलीस आपल्या साठी सज्ज उभे आहेत. यांना ही घर आहे, संसार आहेत, मुलं आहेत, घरातील वयोवृद्ध आजारी आहेत; तरी सुद्धा घराचा विचार न करता हे देशासाठी, महाराष्ट्रासाठी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या जीवासाठी त्यांच्या कुटुंबासाठी हे झटताहेत. याचं नागरिकांनी भान ठेवावे व नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी असे आवाहनही निलेश माने यांनी पंढरपूरकरांना केले आहे.

पंढरीतील विविध भागात भर उन्हात चालत फिरुन पोलीसांना नाष्टा, चहा व बिस्लेरी बॉटल देताना आपलं कर्तव्य म्हणून तोंडाला मास्क बांधलेला असतो व दर अर्ध्या तासाला हॅन्डवॉशने हाथ धुवुन आपली व आपल्या परिवाराची सुरक्षितताही जपल्याचे निलेश माने यांनी सांगितले. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *