👁 10 Views

संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करुन श्रीविठ्ठल-रुक्मिणीची पुजा करणार्‍या भाजपा आमदार व मंदिर समितीच्या सदस्यावर गुन्हा दाखल

पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात संचारबंदी लागु आहे, पंढरीतील श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनही बंद आहे. वर्षातील मोठ्या यात्रांपकैकी एक असलेल्या चैत्री यात्रेच्या दिवशी सुध्दा श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद होते. शासनाच्या आदेशाचे पालन करत विठ्ठलाचे भक्त आणि वारकर्‍यांनीही चैत्री वारीला पांडुरंगाचे नगरीत येणे टाळले. परंतु दि. 4 एप्र्रिल 2020 रोजी पहाटे   उस्मानाबाद येथील भाजपाचे आमदार सुजितसिंह मानसिंह ठाकुर व श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य संभाजी शिंदे व त्यांच्या पत्नी यांनी श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे मंदिरात प्रवेश करुन पुजा अर्चा करत कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबतीची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल  बालाजी शिवाजी कदम यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 4 एप्रिल 2020 रोजी पहाटे 3:30 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास सुजितसिंह ठाकुर (रा. उस्मानाबाद) व संभाजी शिंदे (रा.भाळवणी, ता.पंढरपूर) यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणी ची पुजा अर्चा करुन संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे, साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करुन श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे एकत्र जमुन कोरोना विषाणुचा संसग र्  फैलावण्याचा धोका आहे. याची जाणीव असताना सुध्दा सपत्नीक पुजा अर्चा केली. म्हणुन पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात त्यांचेविरुध्द णादवि 269, 270, 188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 51 (ब), 37 (3)/135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली आहे. अधिक तपास सपोनि करे हे करत आहेत.  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *