👁 9 Views

कर्मयोगी पब्लिक स्कूल, शेळवे शाळेत ऑनलाईन अभ्यासास प्रारंभ

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात शेळवे ता. पंढरपूर येथील कर्मयोगी पब्लिक स्कूलमध्ये मुलांच्या भवितव्याचा विचार करून ऑनलाइन शाळा हा उपक्रम सुरू केला आहे. 


सर्वत्र लॉकडाऊन असल्याकारणे सर्व शाळांला लवकर सुट्ट्या लागल्या आहेत. संचारबंदी मुळे मुलांना बाहेर फिरता येत नाही त्यामुळे घरी बसून मुले कंटाळून जाऊ नयेत म्हणून सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करत  झूम अँप द्वारे अध्यापन करण्याची सुविधा कर्मयोगी पब्लिक स्कूल, शेळवे चे उपप्राचार्य श्री. एस. एन. दास यांनी सुरु के ली  आहे. यामध्ये प्रशालेतील श्री. श्रीशैल शिरोळकर सर, श्री. धनाजी कदम सर, श्री. तुरेवाले सर, श्री. तिवारी सर नियमित अध्यापन करत आहेत. 


आजची पिढी सोशल मीडिया चा जास्त वापर करताना दिसत आहे याआधारे ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून झूम अँप द्वारे मुलांचा  घरबसल्या अभ्यास घेतला जात आहे. यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळाली असून वेळेचा सदूपयोग पण होत आहे. व्हॉट्सअप वर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार केला असून त्या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चालू घडामोडीबाबत अभ्यास दिला जातो तसेच नियोजित पाठ्यपुस्तकातील प्रकरणांचे अनुक्रमे अध्यापन केले जात आहे. 


ऑनलाईन प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून घेतल्या जात आहेत. मुलांच्या अभ्यासक्रमात येणाऱ्या अडी -अडचणी सोडवून दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून संतोष व्यक्त होताना दिसत आहे. 
कोरोना विषाणू मुळे मिळालेल्या  या सक्तीच्या सुट्टीचा असाही उपयोग केला जातोय याबद्दल प्रशालेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *