👁 8 Views

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर 30 एप्रिलपर्यंत श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन बंदच

पंढरपूरLive – कोरोना व्हायरस (कोविड-19) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.17/03/2020 ते दि.30/04/2020 या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी  बंद करण्यात आलेले आहे. 

  तथापि, कोरोना व्हायरस चा वाढता प्रभाव लक्षात घेता, मा.राज्य शासनाने दि.30/04/2020 पर्यंत राज्यभर लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार मंदिरे समितीने श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.30/04/2020 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधित आहेत. त्यामुळे श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी, हजारो वर्षाचे प्रथा व परंपरांची सांगड घालून करणे आवश्यक आहे. कामातील त्रुटींमुळे भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही यासाठी पुरेपर दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच वारकरी सांप्रदायाचे श्रींच्या नित्योपचारंाबरोबर अन्य प्रथा परंपरा यावर कटाक्षाने लक्ष असते ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथपर्यंतचे सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदनउटी पुजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात येत आहे. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

  सदरचे पत्रक श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे सर्व सदस्य महोदय यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *