👁 8 Views

लॉकडाऊन काळात दवाखाने सुरु आहेत- निमा चे सचिव डॉ. सोमनाथ शिंदे यांनी दिली पंढरीतील सुरु असलेल्या दवाखान्यांची यादी

Pandharpur Live- Covid- 19 च्या गंभीर परिस्थितीत काही डॉक्टरांनी आपले दवाखाने,बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवले आहेत, या पार्श्वभूमीवर सामान्य जनता, शासन, राजकीय नेते तसेच प्रसारमाध्यमे यांच्यात गैरसमज पसरुन सर्वच दवाखाने बंद असल्याचे व त्यामुळे असंतोष पसरत असल्याचे चित्र एक प्रकारे दिसत आहे. परंतु आमच्या सर्व आयुर्वेद आणि युनानी खाजगी डॉक्टरांनी आपली सेवा आधीपासूनच पुर्ववत सुरु ठेवली आसुन संघटनेने सुद्धा आपल्या सदस्यांना दवाखाने बंद ठेऊ नका असे आवाहन आधीपासूनच केले आहे. आमचे बहुसंख्य डॉक्टर्स हे जनरल प्रॅक्टीस करत असुन सर्वात आधी कोणताही रुग्ण आमच्याकडे येतो.त्यामुळे सर्वात जास्त धोका हा आमच्या डॉक्टरांना आहे. असे असताना शासकीय आरोग्य यंत्रणेवरील  अतिरिक्त ताण कमी व्हावा, इतर आजारान्च्या रुग्णांना विनात्रास सेवा मिळावी, सामान्य जनतेमध्ये असंतोष पसरू नये,शासकीय यंत्रणेला मदत व्हावी,यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा  लावून, शक्य ती जास्तीत जास्त काळजी घेऊन शासनाच्या निर्देशान्चे जास्तीत जास्त पालन करुन आमच्या डॉक्टरांना त्याबद्दल मार्गदर्शन करुन आपले दवाखाने सुरु ठेवण्यास संघटनेने सांगितले आहे. आणि म्हणूनच आमच्या  सर्व  डॉक्टर्स चे दवाखाने सुरु आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेला आपले पुर्ण लक्ष हे उेीेपर रुग्णावर देने शक्य होत असुन त्यासंबंधीत सेवेवर पुर्ण ताकदीनिशी कार्य करता येत आहे.

तेव्हा रुग्णांनी घाबरुन न जाता गरज पडल्यास आयुर्वेद आणि युनानी फॅमिली फिजिशियन कंन्सल्टन्स आपली सेवा सदैव सुरु ठेवणार आहेत हे लक्षात घ्यावे. सर्व  संघटनेच्या डॉक्टरांना आशी विनंती आहे की, राष्ट्रीय व मानवतेच्या प्रति डॉक्टरांवर असलेल्या कर्तव्याला तसेच जबाबदारीला जागुन सर्वांनी आपले दवाखाने व रुग्णालये सुरू ठेवावीत.असे आवाहन निमा महाराष्ट्र राज्य शाखा करीत आहे. अशी माहिती निमा पंढरपुर शाखेचे सचिव व निमा महाराष्ट्र राज्य शाखेचे सह समन्वयक डॉ सोमनाथ शिंदे यांनी सांगितले. 

नॅशनल इन्टिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA)ही आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांची  देशभर असलेली मोठी आणि एकमेव संघटना आहे. या संघटनेची महाराष्ट्र राज्य शाखा हि जवळ पास 70,000 आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करते.आमचे सर्व डॉक्टर्स हे राज्यभर प्रभावीपणे शासकीय आणि खाजगी आरोग्य क्षेत्रात आपली सेवा देतात. 

डॉ सोमनाथ शिंदे यांनी पंढरपुर परिसरात रुग्णसेवा देत आसलेल्या आयुर्वेद- आय एस एम डॉक्टरांची नावे व ठिकाणे रुग्णांच्या माहिती करिता खाली दिली आहेत. 
डॉ व्हनमाने- भादुले चौक 
डॉ अमरसिंह जमदाडे-विठ्ठल
 हॉस्पिटल 
डॉ डि डि देशपांडे-नाथ चौक
डॉ मदन क्षीरसागर-भोसले चौक
डॉ धायतडक-स्टेशन रोड
डॉ ए एम गायकवाड-संत पेठ
डॉ मिलिंद जोशी-प्रदक्षणा रोड
डॉ सोमनाथ शिंदे -टाकळी रोड
डॉ पराग कुलकर्णी-एस टि स्टॅन्ड समोर
डॉ लवटे-टाकळी रोड
डॉ अमोल सातपुते-संत पेठ 
डॉ श्रीकृष्ण शिंदे-रान्जणी
डॉ करीम साहेब -बंकट स्वामी मठासमोर
डॉ भायगुडे -स्टेशन रोड
डॉ रेपाळ -स्टेशन रोड
डॉ म्हमाणे – पंढरपुर
डॉ अमोल जाधव -खाजगी रुग्णालय
डॉ कानडे -प्रदक्षणा मार्ग 
डॉ विनोद देशपांडे-चप्पल लाईन
डॉ शितल फडे-संत पेठ
डॉ विजय चव्हाण-इसवावी
डॉ विजयसिंह पवार-नगर पालिका समोर
डॉ प्रताप माने-इंदिरा गांधी चौक
डॉ अभिवंत -विठ्ठल हॉस्पिटल 
डॉ लाड – विठ्ठल हॉस्पिटल 
डॉ सिकंदर नदाफ-शिवाजी चौक 
डॉ सचिन थिटे-गांधी रोड
डॉ किशोर बागडे-बजाज ब्लड बॅकेजवळ 
डॉ भोसले-अनिल नगर 
डॉ कोष्ठी-इंदिरा गांधी चौक
डॉ बनकर-संत पेठ
डॉ नकाते- टाकळी रोड 
डॉ खंडागळे-गजानन महाराज मठासमोर
डॉ कारंडे-गजानन नगर 
डॉ सुजीत दुरुदकर-इसबावी
डॉ धीरज जाधव -संभाजी चौक 
डॉ स्वप्निल बाड -जुनी पेठ
डॉ शिंगटे -करकम 
डॉ बाबर-सिकंदर टाकळी 
डॉ शहा -रोपळे 
डॉ सालविठ्ठल-सुस्ते 
डॉ वसेकर-पाटकुल 
डॉ रोगे  -खर्डि 
डॉ रनवरे-कासेगाव 
डॉ पल्लवी माने-इंदिरागांधी चौक
डॉ राजश्री माने- कैकाडी महाराज मठाजवळ 
डॉ मंजुषा देशमुख-लाईफ लाईन हॉस्पिटल 
डॉ प्रवीणा लवटे -टाकळी रोड
डॉ आशालता कारंडे -गजानन नगर 
डॉ स्वाती खटावकर-भक्ती मार्ग .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *