चोरट्यांनी मागील बाजूने फोडलेली दुकाने छाया अमोल कुलकर्णी
खर्डी :(अमोल कुलकर्णी) जगभरात कोरोना सारख्या रोगाने थैमान घातलेले असताना देशातील लॉक डाऊनमुळे सर्व दुकाने,व्यवहार,प्रवास ठप्प आहेत. अशी परिस्थिती असताना राज्यातील पोलिसांवर कामाचा तणाव आहे आणि त्यातच खर्डी येथील खासगी व्यापारी संकुलातील सहा गाळे चोरट्यांनी फोडल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातरवरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर सांगोला महामार्गावरील ज्ञानोबा दशरथ रोंगे यांच्या संकुलात व्यापारी गाळे आहेत त्यापैकी काल मध्यरात्रीच्या सुमारास सहा गाळे चोरट्यांनी मागील बाजूने कटरच्या साह्याने पत्रा उचकटून फोडले आहेत. व दुकानातील सामान, काही वस्तू व रोख रकमेसह डल्ला मारला आहे.यामध्ये रत्नदीप कृषी केंद्र,मकर बेकरी, डी.एस.शूज, यासह तीन गाळे फोडले आहेत. सरपंच रमेश हाके यांच्याही गाळ्या चा पत्रा उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती वाघमारे सर यांनी दुकान उघडून पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी लगेच तालुका पोलिस स्टेशनला कळविले.
सदर चोरी प्रकरणी पंढरपूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर सागर कवडे, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली घटना स्थळावर हाताचे ठसे घेण्यात आले असून तपास अधिकारी प्रकाश इंगोले,पोलीस नाईक शिंदे यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे.गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.


