👁 11 Views

पंढरीत पेंटींगद्वारे व्यक्त केली डॉक्टर, पोलीस व आरोग्य सफाई कामगार यांच्याप्रती कृतज्ञता

Pandharpur Live- सध्या संपूर्ण जगावर कोरोना या महामारीने हाहाकर माजवला आहे, जगातील लाखो लोक कोरोना ग्रस्त व भारतातील शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत, सरकार सर्वतोपरी यावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या शत्रूचा हल्ला सध्या डॉक्टर, पोलीस व आरोग्य सफाई कामगार ढालीप्रमाणे आपल्या अंगावर घेऊन त्या कोरोना व्हायरसचा (महामारीचा) नायनाट करण्यासाठी सतत लढा देत आहेत, त्यांचे हे महत्त्वाचे योगदान समाजापुढे येण्यासाठी हा प्रयत्न म्हणून हे चित्र येथे साकारले आहे.

महाराष्ट्र सरकारने संचारबंदी जाहीर करुन जीवनात वस्तू व आरोग्यसेवा चालू ठेवत इतर व्यवहार बंद ठेवून जनतेची गर्दी कमी करून सोशल डिस्टन्स अंतर ठेवण्यास वारंवार आवाहन करुन या संसर्गजन्य रोगाचा प्रसार कमी करणेसाठी कर्तव्यदक्ष पोलीस, आरोग्य विभागाचे डॉक्टर व सफाई कामगार हे तिन्ही विभाग महाराष्ट्रामध्ये अहोरात्र कष्ट घेत आहेत, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबींचा उहापोह लक्षात घेऊन आम्ही सर्वांनी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्या लक्षात आणून देऊन नगरपरिषदेची पूर्वपरवानगी घेऊन संदेश वाहक चित्र पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रेखाटण्यात आले आहे,


याकरिता प्रमुख चित्रकार जगदीश डांगे सर (लोकमान्य विद्यालय पंढरपूर), शंकर आंबले टेलर, समाजसेवक संतोष कवडे, अजित माने सर मतिमंद विद्यालय, मोहन थोरात सर नवजीवन अपंग शाळा, महेश निर्मळे रोटरी क्लब माजी अध्यक्ष, मनोज चोबे, अमित थिटे सर, मंगेश थिटे यांनी परिश्रम घेतले व यासाठी रंग कामाचे योगदान संजय वाईकर यांचे लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *