पंढरपूर पासून 16 किलोमीटर अंतरावर शेळवे च्या माळावर असलेल्या कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज ने अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन टिचिंग करण्यास सुरुवात केली आहे. हे कॉलेज सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, सास्कृतीक व तांत्रिक स्तरावर अग्रेसर असते. मा. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रेरणेतून सुरू केलेल्या या कॉलेजचे कौतुक सर्व स्तरावरून केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य व देशपातळीवरील कोरोनाचा(covid-19) वाढता प्रादुर्भाव, social distancing चे गांभीर्य, राज्य व केंद्र शासनाने सुचवलेली खबरदारी व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील सर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना इ-नोट्स व ऑनलाइन टीचिंग करण्यास सुरुवात केली आहे.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे शाखानिहाय व वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असून त्या ग्रुप वर प्रत्येक विषयाच्या इ-नोट्स, पीपीटी, युट्युब लिंक, एन पी टी इ एल व्हिडिओ, नॅशनल डिजिटल लायब्ररी च्या लिंक सारखे इ-कन्टेन्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. सदरील ग्रुपच्या व ई-मेल च्या माध्यमातून ए.आय.सी.टी.ई ,आय.आय.टी व वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपन्यांनी आयोजित केलेल्या faculty development program, Student training program, certification courses, webinar, interactions, soft skill programs, GATE tutorials यामध्ये विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सहभाग लक्षणीय आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, झूम क्लाऊड, सिस्को वेबेक्स, गूगल क्लासरूम यासारखी मोबाईल ॲप्स व ऑनलाइन मेडीयम वापरून प्राचार्य, विभाग प्रमुख शिक्षक व विद्यार्थी यांच्या बैठका आयोजित करण्यात येत आहेत. प्रत्येक शिक्षकाने सदरील तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन टीचिंग करण्यास सुरुवात केली आहे. तसेच गुगल फॉर्म वापरून विद्यार्थ्यांची ची स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहेत. 3 मे 2020 पर्यंत विभाग निहाय ऑनलाइन टिचिंग चे वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक वर्गाचे दररोज चार तास ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यास सुरुवात केली आहे. सदरील तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थी पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
महाविद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्याशी संलग्नीत असून तृतीय
व चतुर्थ वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्याशी संलग्नित आहे. एम सी क्यू पद्धतीच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयाची यंत्रणा सध्यास्थितीत तयार आहे.
वरील सर्व परीक्षा पद्धतीत व शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरी राहूनच आपला सहभाग नोंदवायचा आहे. तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व प्राचार्य घरी राहूनच ही कार्यप्रणाली पार पाडणार आहेत. मा. प्राचार्य डॉ.एस पी पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना घरी रहा सुरक्षित रहा ,आपल्या कुटुंबातील लहान व वृद्ध मंडळींची काळजी घ्या, शासनाने सांगितलेल्या खबरदारीचे पालन करा असे आव्हान केले आहे. विद्यापीठाकडून येणाऱ्या सूचना वेळापत्रके तसेचअद्यावत माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप व ई-मेल च्या साह्याने पोहोचवण्यात येईल तरी विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप ग्रुप आणि ई-मेलच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे असेही आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहावेअसे आवाहन कॉलेजचे रजिस्टार श्री
गणेश वाळके यांनी केले. हा उपक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपप्राचार्य मुंडेगावकर जे ल सर्व विभाग प्रमुख प्रा. बाबर ए. टी. प्रा. कुलकर्णी एस. एम., प्रा. शिवपुजे डी बी, प्रा.तिवारी एन जी, प्रा.पांचाळ आर जे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी योगदान देत आहेत. वेबसाईट व
इंटरनेट च्या अध्यावत सेवा व सुविधा देण्याचे काम प्रा. डी व्ही भोसले हे तन्मयतेने करत आहेत.

