👁 4 Views

पंढरपूर सिंहगडचे प्रा. अतुल आराध्ये यांना पीएच डी प्राप्त

 पंढरपूर: पुढारी वृत्तसेवा

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये प्राध्यापक असलेले प्रा. अतुल आराध्ये यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनिअरींग विषयात पी. एच. डी. पदवी प्राप्त झाली आहे.


    “”वारक-यांची दर्शन व्यवस्था” या विषयावर हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. डाॅ. श्रीकांत कल्लुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा शोधप्रबंध पूर्ण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे प्रबंध सादर केला होता.


   डॉ. अतुल आराध्ये यांनी पीएच डी प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डाॅ. भालचंद्र गोडबोले, 


प्रा. अनिल निकम, प्रा. नामदेव सावंत, प्रा. राजेंद्र पाटील आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *