👁 6 Views

खुन्नसने पाहण्यावरून युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून

 

राजगुरुनगर: जुन्या भांडणाच्या वादाच्या कारणावरून सहा जणांनी धारदार शास्त्राने एकाचा खून केल्याची घटना (दि ६ रोजी ) चांदुस ,वाळुंज वस्ती ( ता खेड ) येथे घडली आहे.शुभम निवृत्ती काळे (वय २० रा.काळेबडे वस्ती, चांदुस, ता.


खेड ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत संदिप अशोक कल्हाटकर, यशराज विजय वाघमारे , सुरज गोगावले ( रा. कोरेगाव ता.खेड ),वैभव कोळेकर (रा. कडाची वस्ती, किवळे ता.खेड ) शुभम् उर्फ सोन्या चंद्रकांत कारले (रा.विठ्ठलवाडी चांदुस ता खेड ), करण कारले या सहा जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे.


या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी शुभम काळे याच्याबरोबर आरोपींची भांडणे झाली होती. तसेच आठ दिवसापूर्वी खुन्नस ने पाहिल्यामुळे या सहा आरोपींनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शुभम घराकडे चालला असताना वाळुंज वस्ती येथे निसर्गश्रृष्टी प्लॉटींग जवळ चांदुस कोरेगाव रोडवर त्याच्यावर तोंडावर व हातावर धारधार हत्याराने सपासप वार केले.


 हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला उपचाराचारासाठी राजगुरूनगर येथील सश्रुत हॉस्पिटल येथे आणले असता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *