👁 13 Views

सोलापूर जिल्हृयात 1 लाख 18 हजार 74 लाभार्थ्यांनी घेतला शिवभोजन योजनेचा लाभ

        सोलापूर दि. 29 :  जिल्हृयात 1 लाख  18 हजार 74 लाभार्थ्यांनी शिवभोजन योजनेचा लाभ घेतला आहे.   लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात 80 हजार 653 गरजू आणि गरीब लोकांना लॉकडाऊनच्या कालावधीत आधार मिळाला, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
          जिल्ह्यात एकूण 26 शिवभोजन केंद्रे आहेत. त्यापैकी पाच शहरात तर 21 ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यासाठी दररोज एकूण 3500 थाळींचे उद्दीष्ट आहे. आजपर्यंत शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजू लोकांना पुरविण्यात आलेल्या एकूण थाळींची संख्या 118074 आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले. 
          जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य, गॅस इत्यादीचा नियमित पुरवठा सुरु आहे. खुल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अन्नधान्य पुरेसे आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा आणि शहरात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे सुरळित वितरण सुरु आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन , इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या 20 वितरकाद्वारे शहरात वितरण सुरु आहे. त्यांच्याकडून सिलेंडर वितरण सुरु आहे. गॅस सिलेंडर रि‍िफलींग करणारे केंद्र शहरालगतच असल्याने सिलेंडरचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये, असेही आवाहन त्यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *