👁 10 Views

सोलापूर जिल्ह्यातील दारूची दुकाने १७ मे पर्यंत बंदच… जिल्हाधिकारी यांचे आदेश



पंढरपूर लाईव्ह- राज्यातील काही भागातील दारूविक्रीची दुकाने आजपासुन खुली झाली असली तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र दारू विक्री येत्या 17 मे पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय  सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी घेतला आहे.  यासंदर्भात त्यांनी आदेश जारी केला आहे.  त्यामुळे तुर्तास तरी जिल्ह्यातील मदिराप्रेमींची घोर निराशा झाल्याचे आढळुन  येत आहे.

सोलापूर शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या व बाहेरून नव्याने जिल्ह्यात प्रवेश करणारे नागरिक याचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी हा निर्णय घेतला आहे.  या आदेशाची प्रत जिल्ह्यातील मद्य विक्रेत्यांनाही जारी केली आहे.

आदेशाचा भंग करणारांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *